12:01pm | Mar 20, 2024 |
कराड : जगातील आघाडीच्या विश्वविद्यालयांमध्ये गणना होणाऱ्या न्युझीलंडमधील हॅमिल्टन येथील वाईकटो विद्यापीठाची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती कराड तालुक्यातील किरपे येथील अथर्व सुरेंद्र देवकर याला मिळाली आहे. हा सन्मान मिळवणारा तो कराड तालुक्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
किरपेसारख्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असणाऱ्या अथर्वने अत्यंत जिद्दीने पुण्याच्या इंदिरा कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून विशेष श्रेणीत पदवी संपादन केली असून आता 'मास्टर इन फायनान्स' या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याला वाईकटो विद्यापीठात शिकण्याची संधी प्राप्त झाली आहे. शिवाय यासाठी विद्यापीठाकडून १५ हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती मिळाली आहे. भारतीय चलनात ही शिष्यवृत्ती साडेसात लाख रुपयांची आहे. अथर्वच्या यशामध्ये त्याची आई दीपा व वडील सुरेंद्र यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे राहिले आहे. हे दोघेही उच्चशिक्षित असून सुरेंद्र देवकर हे पुण्यातील इंदुमती एचआर फॅसिलिटीज प्रा. लि. चे संचालक आहेत.
अथर्वचे उच्च शिक्षण परदेशात व्हावे अशी आम्हा कुटुंबीयांची मनोमन इच्छा होती. त्यादृष्टीने अथर्वही ध्यास घेऊन अविश्रांतपणे धडपडत होता. त्यामुळेच त्याला ही मोठी संधी मिळाली असून यापुढील काळात त्याने अशीच मेहनत घेऊन चांगले यश मिळवावे व गावाचा तसेच जिल्ह्याचा लौकिक वाढवावा अशी प्रतिक्रिया त्याचे वडील सुरेंद्र देवकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
या याबद्दल किरपे पंचक्रोशीसह जिल्ह्यातून अथर्वचे अभिनंदन केले जात आहे.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |