कराड : फरारी आरोपी याने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीस अमिष दाखवुन पळवुन नेल्याचा गंभीर अपराध केला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पोलीस अंमलदार यांनी या गुन्ह्यातील फरारी आरोपी बज्या उर्फ बजरंग सुरेश माने, रा. बुधवार पेठ, कराड, ता. कराड याची गोपनीय बातमीदार तयार करुन माहीती काढण्याचे प्रयत्न सुरु केले होते. दि. 2 एप्रिल रोजी गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त खात्रीशीर बातमीप्रमाणे खातरजमा करता संशयित बज्या माने हा कराड परीसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. कॉ. आनंदा जाधव, महेश शिंदे यांनी कराड शहरालगत वारुंजी फाटा-पाटण रोड येथे सापळा रचुन थांबले असताना संशयिताला पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळुन जाण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार पो. कॉ. आनंदा जाधव व पो. कॉ. महेश शिंदे यांनी त्यांस पाठलाग करुन शिताफीने पकडले.
बज्या उर्फ बजरंग सुरेश माने, वय- 30 वर्षे. रा. बुधवार पेठ, कराड ता. कराड हा संशयित गुन्हा केल्यापासुन फरार झाला होता. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष फडतरे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील व पोलीस अंमलदार स. फौ. रघुवीर देसाई, स. फौ. संजय देवकुळे, पो. हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी सहभाग घेतला.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |