01:05pm | Jul 10, 2020 |
महाबळेश्वर: ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या प्रभावाने महाबळेश्वर, पाचगणी परिसरात काही दिवस मुसळधार पावसाने थैमान घातले. परंतु यानंतर उनपावसाचा खेळ सुरू झाला. मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत पाणी प्रश्नही चिंता वाढवू लागला होता. दरम्यान गेल्या तिन दिवसांपासून सुरू असेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा महाबळेश्वरचे रूपडे पालटले आहे. तसेच या पावसाने पाणी प्रश्नाची चिंताही मिटवली आहे.
महाबळेश्वर, पाचगणीत सध्या सुरू असलेली कोसळधारेने महाबळेश्वरचा वेण्णा (लेक) तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे महाबळेश्वर पाचगणीच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर - पाचगणीकरांची तहान भागविणारे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण वेण्णा तलाव तुडुंब भरला. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून वेण्णालेकसह परिसरात सर्वत्र दाट धुके पाहावयास मिळत आहे. काल दिवसभरात 178 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वेण्णालेक परिसरात रेनकोट, छत्री घालून सेल्फी घेताना स्थानिक हौशी नागरिक पाहावयास मिळत असून मुसळधार पाऊस, दाट धुके आणि वार्याचा ते आनंद घेत आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |