08:20pm | Apr 15, 2024 |
सातारा : महायुतीचे तिकीट मिळणार, नाही मिळणार या चर्चांना बाजूला ठेवून खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याची अखंड भ्रमंती सुरू ठेवली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला तीन दिवस उलटले असून महाविकास आघाडीच्या आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. महायुतीचे उमेदवार सातारा लोकसभेसाठी जाहीर झालेले नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळणार का, हा प्रश्न उत्सुकतेचा असला तरी त्यापुढे येत्या 18 एप्रिल रोजी खासदार उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वीच लोकसभेचा उमेदवारी अर्ज खरेदी केला होता आणि सोमवारी त्यासाठी लागणारे 25 हजार रुपयांचे अनामत शुल्क त्यांनी भरले. त्यामुळे तिकीट मिळो अथवा ना मिळो या चर्चांपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या दहा याद्या प्रसिद्ध झाल्या. त्याच्यामध्ये अजूनही उदयनराजे भोसले यांचे नाव आलेले नाही. कोल्हापूरमध्ये राजेंना घरी जाऊन तिकीट दिले जाते. मात्र सातार्यात उदयनराजे यांना महायुती तिकिटासाठी ताटकळत ठेवते, हा विरोधाभास उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करायला लावणारा आहे. मात्र मला तिकीट मिळणारच, असा ठाम विश्वास बाळगून महायुतीच्या वरिष्ठांशी दिल्लीत चर्चा करणारे उदयनराजे गेल्या दहा दिवसापासून पायाला भिंगरी लावून जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत.
येत्या 18 एप्रिल रोजी भव्य शक्ती प्रदर्शनाने उदयनराजे यांचा अर्ज भरला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे. यासंदर्भात सूत्रांनी जरी माहिती दिली तरी अजूनही त्या संदर्भातील तयारी सुरू आहे, असेही सांगण्यात आले. उदयनराजे भोसले अपक्ष असणार की महायुतीच्या वतीने, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र तरीही एकंदर उदयनराजे यांचा राजकीय आवेश पाहता सातार्याच्या राजकीय रणांगणात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे.
शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा आता नाही तर कधीच नाही असा स्टेटस ठेवल्याने ते सुद्धा अपक्ष म्हणून सातार्याच्या राजकीय आखाड्यात शड्डू ठोकू शकतात. त्यादृष्टीने त्यांचीही वाटचाल आहे. तेही येत्या दोन-तीन दिवसात अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सातार्यात आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |