05:46pm | Feb 10, 2022 |
पाटण : पाटण नगरपंचायत पदाधिकारी निवडीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीने बाजी मारली. पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ. मंगल शंकर कांबळे व उपनगराध्यक्षपदी सागर दादासो पोतदार यांची बिनविरोध निवड झाली. नुकतीच काही दिवसांपूर्वी पाटण नगरपंचायतीसाठीची मतदान प्रक्रिया पार पासून निकाल जाहीर झाले. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होते.
राष्ट्रवादी तथा पाटणकर गटाच्या पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीकडे नगरपंचायतीच्या सतरा पैकी तब्बल पंधरा सदस्यांचे बहुमत होते. तर विरोधी शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाकडे अवघ्या दोन नगरसेविका असल्याने नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष पाटण विकास आघाडीचाच होणार हे निश्चित होते. त्यानुसार बुधवार, दि. ९ रोजी नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम क्षणी आघाडीच्या सौ. अनिता देवकांत यांनी माघार घेतल्याने सौ. मंगल कांबळे यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली. गुरुवार, दि. १० रोजी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
गुरुवारी नगरपंचायत कार्यालयात पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनिल गाढे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी पाटण शहर राष्ट्रवादी विकास आघाडीच्या वतीने सागर दादासो पोतदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विरोधी शिवसेना ना. देसाई गटाकडून उपनगराध्यक्ष पदासाठीही कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. छाननीत सागर पोतदार यांचा अर्ज वैध ठरला व त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सुनिल गाढे व अभिषेक परदेशी यांनी अभिनंदन केले. या निवडीनंतर बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, नगरपंचायतीत नव्याने निवडून आलेले सर्वच नगरसेवक, नगरसेविका या पदाधिकारी असून केवळ औपचारिकता म्हणून नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष पदांवर या दोघांची निवड झाली आहे. जी
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |