सातारा : पुसेगाव, ता. खटाव, जिल्हा सातारा येथील पोलीस स्टेशनचा केंद्राच्या पाहणीनुसार सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून राज्यात प्रथम, तर भारत देशात दहा पोलीस स्टेशनमध्ये क्रमांक आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या व पुसेगाव नगरीच्या नावात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केंद्राच्या पाहणीनुसार पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक परिषद 2022 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान पुसेगावला देण्यात आला. पोलीस ठाण्याचा क्राईम रेट, गुन्ह्यांची तपासणी, ऑनलाईन कामाची पद्धत, वेळेत कामकाज पूर्ण करणे, लोकाभिमुख कार्य, चारित्र्याचे दाखले अशाअनेक अटी व शर्ती पास करत हा बहुमान मिळवला. यासाठी स्पर्धा सुरू होणार त्यापासूनचे सर्व अधिकारी कर्मचारी पुसेगाव, खटावसह खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्व जनता, लोकप्रतिनिधी, विविध मंडळांचे अध्यक्ष, विविध दैनिकांचे पत्रकार, इलेक्ट्रिकल डिजिटल मीडिया, पदाधिकारी, कार्यकर्ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा हा गौरव असल्याची पोचपावती म्हणून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापुसाहेब बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि संभाजी गायकवाड, सपोनि चेतन मछले, सपोनि संजय बोंबले, सपोनि राजेंद्र सावंत्रे व पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील यांच्याबरोबर विविध गावचे पोलीस पाटील, पोलीस होमगार्ड, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातून विविध स्तरावरून पुसेगाव पोलीस स्टेशनचे अभिनंदन करण्यात येत आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |