मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षाचे पहिले निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद हा न्यायप्रविष्ट असून अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे’ अशी अजित पवार गटाने जाहिरात प्रकाशित केली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या जाहिरातीला आक्षेप घेत, हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याचा दावा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना वृत्तपत्रांव्दारे जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे आदेश दिले असून घड्याळ चिन्ह प्रकाशित करताना सर्वत्र इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीनही भाषेत महत्त्वाची नोंद नमूद करण्यास सांगितले आहे. अजित पवार यांना केवळ खटल्याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पोस्टर्स, बॅनर्स या प्रत्येक ठिकाणी घड्याळ चिन्हाचे वापर करताना ‘चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’, असे नमूद करणे अनिवार्य असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
सोयीस्कररित्या स्वार्थ...
या जाहिरातींव्दारे जनतेची दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच अक्षरशः केराची टोपली दाखवण्याचे काम करण्यात आल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे. जनतेने अजित पवार गटाचा हा जाहिरातीमागील सोयीस्कररित्या साधलेला स्वार्थ लक्षात घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |

सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |