मसूर : कराड तालुक्यातील मसूर येथील मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शाळेतील मुलींनी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या गीतांवर बहारदार नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
वर्षभर अभ्यास, अभ्यास विषयक वेगवेगळे उपक्रम यातून जरा मोकळा वेळ मिळावा, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना यातून निखळ आनंद मिळावा, त्यांचे मनोरंजन व्हावे या हेतूने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
मुलींना वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकायला मुळातच आवडते. याप्रसंगी ' हलगी वाजली'या गीताने सर्वांनाच ठेका धरायला लावला. 'पिचली माझी बांगडी', 'मुळीच नव्हतं रे कान्हा' या गवळणींनी कार्यक्रमाला अगदी बहार आणली. तसेच 'मंगळागौर गीत', 'सुपात जोंधळ घोळीते' अशा गाण्यांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे खूप सुंदर दर्शन घडवले. 'कुऱ्या चालल्या रानात' या गीतामधून शेती आणि शेतकरी याबद्दल मुलींनी आपले प्रेम व आदर व्यक्त केला. त्याबरोबरच 'हिची चाल तुरुतुरु', 'गाणं वाजू द्या', 'नको मला साडी' अशा गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. तर छोट्यांच्या 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'अशा गाण्यांनी कार्यक्रमाचा गोडवा वाढवला.
अशाप्रकारे कार्यक्रम खुलवत - खुलवतच 'मोबाईलचा अतिवापर टाळा' असा संदेश देणाऱ्या नाटुकल्या सादर करायलाही विद्यार्थिनी विसरल्या नाहीत. कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर, परिपूर्ण असे सादरीकरण झाले. बहारदार गीतांना पालकांनी अगदी उत्स्फूर्तपणे दाद दिली, बक्षिसेही दिली. कार्यक्रमाला मसूर गावच्या पोलीस पाटील सौ. तिलोत्तमा वेल्हाळ, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, सिकंदर इनामदार, सामाजिक कार्यकर्ते भूषण पटेल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदेश जगदाळे, उपाध्यक्ष वैभव गुरव, सदस्य साक्षी फडतरे, पूजा साळुंखे, स्वाती जंगम, अमित जगताप, प्रशांत वाघ यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बाजारे, सहशिक्षक सुनिता तोडकर, सुरेखा जगदाळे, स्वाती बाजारे, लक्ष्मीकांत जाधव यांनी परिश्रम घेतले. तसेच या कामी त्यांना राजश्री बनकर, सारिका हस्ते, विक्रम जगदाळे, निलेश कुंभार, वसीम मोमीन यांनी बहुमोल असे सहकार्य दिले. लाईट व साऊंड सिस्टिम व्यवस्था गणेश लोहार यांनी केली. सूत्रसंचालन स्वाती बाजारे यांनी केले.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |