पाटण : नवारस्ता ते मरळी जाणारे रोडवर नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
नितीन बबन तिकुडवे (वय 36, रा. शिंदेवाडी, ता. पाटण), भरत रामचंद्र पाटील (वय 43), बबन धोंडिराम पडवळ (वय 70 दोघेही रा. येरफळे, ता. पाटण) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अनिकेत ज्ञानदेव पाटील (रा. शिंदेवाडी, ता. पाटण), संकेत सिताराम शिंदे (रा. तामकणे, ता. पाटण) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत नितीन बबन तिकुडवे याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवारस्ता ते मरळी जाणारे रोडवर नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ दुचाकीवरून नितीन तिकुडवे याने त्याचे ताब्यातील दुचाकीवर पाठीमागे अनिकेत पाटील यास बसवून नवारस्ता ते मरळी बाजूकडे हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवित जात असताना समोरून मरळी ते नवारस्ता बाजूकडे जाणारे दुचाकीवर असणारे चालक भरत पाटील, धोंडिराम पडवळ व संकेत शिंदे यांना सांगवड पुलाजवळ रॉग साईडला जावून जोराची धडक दिली. हि धडक इतकी भिषण होती की या धडकेमध्ये नितीन तिकुडवे, भरत पाटील व बबन पडवळ हे ठार झाले, तर अनिकेत पाटील व संकेत शिंदे हे गंभीर जखमी झाले.
याबाबत पाटण पोलिसात पोलीस हवालदार कांबळे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी मयत नितीन बबन तिकुडवे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |

दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |