02:43pm | Apr 08, 2024 |
कराड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी नेमलेल्या दोन हजारवर झोनल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. मतदान प्रक्रीया चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी कोणत्या खबरदारी घ्यावी यासाठीचे प्रशिक्षण देवुन संबंधितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी मतदान यंत्राचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठीचे मतदान सात मे रोजी होणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून (ता. १२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्याच्या मतदानासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती कार्यवाही पुर्ण करण्याची मोहिम सध्या सुरु आहे. त्याअंतर्गत आज मतदानासाठी नेमलेले झोनल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकाऱ्यांना आजपासून कराड दक्षिणचे येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात तर उत्तर विधानसभा मतदार संघाचे प्रशिक्षण सैदापूर येथील समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये देण्यात येत आहे.
उत्तरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, दक्षिणचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, अतिरीक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, दक्षिणच्या तहसीलदार स्मिता पवार, निवडणुक नायब तहसीलदार हेमंत बेसके, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, नायब तहसीलदार रजपुत, नायब तहसीलदार आनंदराव देवकर, निवडणुक अधिकारी युवराज पाटील यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
मतदानासाठीचे व्हीव्हीपॅट मशिन व ईव्हीएम मशिनच्या वापरासंदर्भातील माहिती आणि प्रात्यक्षिक येथील शिवाजी हायस्कुलमध्ये देण्यात आली. त्याचबरोबर मतदानासाठी येणाऱ्या मतदाराकडून कोणते पुरावे असल्यावर मतदान करुन द्यावे. मतदानाच्या दिवशी सकाळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन उघडताना व मतदान झाल्यानंतर मतपेट्या सील करताना कशा पद्धतीने काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा झाली. अधिकारी, कर्मचारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रांताधिकारी म्हेत्रे, तहसीलदार पवार यांनी उत्तरे दिली. युवराज पाटील यांनी आभार मानले.
टपाली मतदानाची सोय :
जे निवडणुक कर्तव्यावर आहेत त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांनी १२ आणि १२ अ हा अर्ज भरुन द्यायचा आहे. त्यांनतर त्यांना टपाली मतदान करण्याचा अधिकारी मिळणार आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी अर्ज भरुन द्यावे, असे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केले.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |