सातारा : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेली एसटी अजूनही ग्रामीण भागातील दळणवळणाचे मुख्य साधन आहे. एसटीचा प्रवास हा रोख पैशांचा असतो. त्यामुळे एसटीला दररोज ताजे उत्पन्न मिळते.
मात्र, अनेकदा जुन्या एसटी बस, त्यांचा दुरुस्ती खर्च, डिझेलच्या अनुपलब्धतेमुळे रद्द कराव्या लागणाऱ्या फेर्या या ना अशा अनेक कारणामुळे एसटीच्या उत्पन्नावर मर्यादा येतात. त्यामुळे दररोजच्या एसटीच्या फेऱ्यांचे किलोमीटर कमी येऊन उत्पन्नही घटते.
त्यामुळे एसटीचा तोटा वाढतो आणि एसटीचे चाक रुतलेलेच राहते. मात्र, येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ, कुलदीप डुबल यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून तोट्यात असणारा एसटी डेपो फायद्यात आणला आहे.
येथील एसटी आगाराने तीन महिन्यांत तब्बल ४५ लाख सात हजार रुपयांचा नफा मिळवला आहे. अधिकारी, कर्मर्यांच्या सामूहिक प्रयत्नातून कराड आगार पहिल्यांदाच सलग तीन महिन्यांत नफ्यात आले आहे.
एसटीच्या येथील आगारातून जुलै महिन्यात सात लाख ८४ हजार किलोमीटरची वाहतूक झाली. त्यातून एसटीला पाच कोटी चार लाख चार हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर ३८ लाख १४ हजार रुपये नफा मिळाला.
ऑगस्ट महिन्यात सात लाख ४७ हजार किलोमीटरची धाव एसटीने घेतली. त्यातून चार कोटी ७५ लाख सहा हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर तीन लाख ७२ हजार रुपये नफा झाला. सप्टेंबर महिन्यात सात लाख २५ हजार किलोमीटरची वाहतूक एसटीने केली. त्यातून चार कोटी ६८ लाख ९४ हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर तीन लाख २१ हजार रुपये नफा मिळाला.
कराड आगारातील एसटीच्या फेर्या :
* एसटीच्या एकूण फेर्या - ७००
* लांब पल्ल्याच्या फेर्या - १७
* मध्यम-लांब पल्ल्याच्या फेर्या - ३०
* ग्रामीण भागातील फेर्या - ६५३
उत्पन्नवाढीस हातभार :
राज्य सरकारने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली. त्याचबरोबर महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घोषित केलेली सवलत आणि महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा या नागरिकांच्या उपयोगी सवलतीमुळे एसटी महामंडळांचे आगार तोट्यातून नफ्यात येऊ लागले आहे. त्यातून कराड आगाराला हे यश मिळाले आहे.
असे मिळाले यश :
* एसटीचे अधिकारी, कर्मचार्यां कडून सामूहिक प्रयत्न
* एसटीच्या वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यां कर्मचार्यांचा मोठा हातभार
* प्रवासी वाढीसाठी एसटीच्या वाहकांनी घेतली मेहनत
* उत्पन्न देणार्या मार्गावर वाढवल्या एसटी बसच्या फेर्या
* एसटीचे तोट्यात रुतलेले चाक फायद्यात आणण्यात यश
ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिला सन्मान योजना व अन्य प्रवासी योजनांमुळे एसटीची प्रवासी संख्या वाढली आहे. त्याचा विचार करून आम्ही कराड आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सामूहिक प्रयत्न करून कराड आगाराला तीन महिन्यांत ४५ लाख सात हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. यापुढेही असाच प्रयत्न करत राहणार आहोत.
- शर्मिष्ठा पोळ एसटी आगार व्यवस्थापक, कराड
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |