08:12pm | Apr 15, 2024 |
सातारा : तुतारीचा नाद आणि ताशाचा कडकडाट अशा जल्लोषात महाविकास आघाडीचे शाहूनगरीमध्ये विराट शक्ती प्रदर्शन झाले. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)च्या कार्यकर्त्यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार शशिकांत शिंदे यांनी खासदारकीचा अर्ज जिल्हाधिकार्यांकडे सोमवारी दाखल केला. यावेळी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी हजारो कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात आली होती.
महायुतीचा सातारा लोकसभेचा उमेदवार ठरला नसला तरी महाविकास आघाडीने सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड केली. सोमवारी शिंदे यांचा अर्ज वाजतगाजत दाखल करण्यासाठी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान स्वतः शरद पवार हेलिकॉप्टरने सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर दाखल झाले. यावेळी कराड दक्षिणचे आमदार कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नितीन बानुगडे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, विक्रमसिंह पाटणकर यांनी पवार साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तेथून गाड्यांचा ताफा थेट गांधी मैदानाकडे रवाना झाला. तत्पूर्वी सकाळी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी हुमगाव, ता. जावळी येथील हुमजाई देवीचे सपत्नीक दर्शन घेतले.
गांधी मैदानावरून भव्य प्रमाणात सजवलेल्या रथावर शरद पवार, आमदार शशिकांत शिंदे आणि महाविकास आघाडीचे नेते स्वार झाले. ताशांचा कडकडाट आणि तुतारीचा निनाद अशा वातावरणात पावणे बाराच्या दरम्यान रॅलीला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गांधी मैदानाचा परिसर दणाणून सोडला. यानंतर रॅलीने गोल बाग येथील प्रतापसिंह महाराज थोरले, शाहू चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सातार्यात गांधी मैदान ते पोवई नाका अशी भव्य रॅली निघाली. या रॅलीला सातारकरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिणामी मोती चौकाकडून नाक्याकडे जाणारी वाहतूक कर्मवीर पथामार्गे वळवण्यात आली होती. गांधी मैदानावर सुद्धा पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात प्रचंड रेटारेटी झाली.
कार्यकर्त्यांचा उत्साह आणि राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन यामुळे महायुतीला जोरदार राजकीय संदेश गेला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान शरद पवार यांच्यासह निवडक पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आपला लोकसभेचा अर्ज दाखल केला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयात ठराविक पदाधिकार्यांना प्रवेश देण्यात आला होता. रॅलीची पोवई नाक्यावरच सांगता झाली. त्यानंतर पुढील बैठकीसाठी शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे रवाना झाले.
महाविकास आघाडीचा सोमवारचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा ठरला. सातारा जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचारात मोठीच आघाडी घेतली आहे. त्यांना उमेदवारी घोषित करण्यावर मुंबईत महायुतीच्या नेत्यांच्या जोरदार बैठका सुरू होत्या. मात्र महाविकास आघाडीने जमवलेली गर्दी आणि त्यातून झालेले शक्तिप्रदर्शन यामुळे सातारा लोकसभेचा सामना चुरशीने रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुन्हा एकदा शरद पवार
सोमवारी अर्ज आमदार शशिकांत शिंदे यांनी जरी भरला तरी या रॅलीचे खरे नायक ठरले ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार यांचे गांधी मैदानावर आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगला जोश आला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नाराज जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सुद्धा रॅलीला आवर्जून उपस्थिती लावत आपला कोणताही गैरसमज नसल्याचे दाखवून दिले. सातारा जिल्हा हा पवारांचा विचार मांनणारा जिल्हा आहे, पवार जे सांगतात तेच सातारकर मतदार करतात, हा गेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे पवारांनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सातारकर स्वतःहून रस्त्यावर आलेले दिसले.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |