09:21pm | Mar 26, 2024 |
सातारा : पाटखळ, तालुका सातारा येथील तलाठी ऑफिसच्या कार्यालयाचे विनापरवाना अतिक्रमित बांधकाम झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ग्रामपंचायत इमारतीच्या लगत असणाऱ्या सांस्कृतिक भावनाच्या जागेतच अतिक्रमण झाल्याने गावातील सामाजिक उपक्रम आणि कार्याची अडचण झाली आहे. ग्रामस्थांनी विरोध करूनही सदर इमारतीचे काम थांबलेले नाही. त्यामुळे गावातील रहिवासी विजय शिंदे यांनी या उपक्रमास विरोध केला असून याची तक्रार थेट जिल्हाधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सातारा ग्रामपंचायत कार्यालयातील तलाठी सज्जासाठी स्वतंत्र कक्ष असावा, अशी बऱ्याच दिवसाची मागणी होती. त्यानुसार सातारा पंचायत समितीच्या वतीने आलेल्या अनुदानासंदर्भात या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात हे काम होताना 224 स्क्वेअर फूट व आठ फूट रुंद या पद्धतीने बांधावयाचे होते. मात्र हे बांधकाम करताना वहिवाटीच्या वर्दळीच्या रस्त्यावर तीन फूट अतिक्रमण करण्यात आले आहे.
याच मार्गामध्ये गावातील समाजभवन येत असल्याने त्या रस्त्याकडे जाण्याची अडचण झाली आहे. या सांस्कृतिक भवनांमध्ये गावातील विविध कार्यक्रम होत असतात. गावातील महिलांसाठी सुद्धा या भवनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र इमारतीच्या अतिक्रमित बांधकामामुळे या भवनांच्या मार्गाकडे जाण्याची अडचण झाली आहे. पाटखळ गावात ग्रामस्थांनी या संदर्भात बैठक घेऊन या चुकीच्या कामासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला होता. या कामावरून ग्रामस्थांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. तरीसुद्धा तलाठी भावनाचे चुकीच्या पद्धतीने झालेले काम थांबलेले नाही.
भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचाही आरोप होत आहे. या संदर्भात गावातील सदस्य विजय शिंदे यांनी या कामासंदर्भात जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सातारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे चुकीच्या पद्धतीने झालेले काम तत्काळ थांबवण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |

सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |