04:16pm | Apr 02, 2024 |
कराड : माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून वडील जागीच ठार झाले. तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. दुसरा पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून सुदैवाने सुखरूप बचावला. कऱ्हाड-चांदोली मार्गावर कालेटेक, ता. कराड गावच्या हद्दीत आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
अंकूश मुरलीधर नडवणे (वय ४०, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर मुलगा ओंकार अंकूश नडवणे (१२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील अंकूश नडवणे हे त्यांच्या दोन मुलांना घेवून मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन (क्र. एमएच ५० टी १२०१) उंडाळेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कालेटेक गावच्या हद्दीत डीपी जैन कंपनीसमोर उंडाळेहून कऱ्हाडकडे निघालेल्या माल वाहतूक टेम्पोची (एमएच ५० - ५२४०) आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अंकूश नडवणे हे जागीच ठार झाले. तर मुलगा ओंकार हा गंभीर जखमी झाला. दुसºया पाच वर्षीय मुलाला किरकोळ दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमी ओंकार याला तातडीने रुग्णालयात हलवले.
अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |