08:23pm | Apr 15, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यात उष्माघात तात्काळ मदत कक्ष सुरु करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातारा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन डॉ. सुभाष कदम यांना देण्यात आले.
काही दिवस महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असून, तातडीचे उपचार न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण उष्माघाताचे बळी पडत आहेत. अजूनही जवळपास कमीत कमी दोन महिने उन्हाचा तडाखा असाच राहणार असल्याचा अंदाज आहे आणि यासाठी तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये या ठिकाणी तातडीने उष्माघात तात्काळ मदत केंद्र सुरू करावीत आणि सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना उष्माघात झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार देण्याचे आणि यात कसूर न करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शासनस्तरावर उष्माघाताने वाचण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याची माहिती वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया द्वारे प्रसारित करावी, अशी मागणी केल्याची माहिती भारतीय जनता पार्टी चे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुद्धा या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरच कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, आरोग्यसेवा आघाडी जिल्हाध्यक्ष अप्पा कदम, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे, अनु जाती मोर्चा प्रदेश चिटणीस ऍड शैलेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |