कराड (सातारा) : चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाच जणांची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगोंडा रायगोंडा पाटील (रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. साहिल साधमियाँ कादरी (रा. राजकोट, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांनी ११ जुलै ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कादरी याच्या कंपनीत ३० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. पैशांची गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षात ज्यादा परताव्यासह रक्कम परत देण्याचे आश्वासन साहिल कादरी याने दिले होते.
मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांनी पैशाची मागणी सुरू केली. त्यावेळी साहिल कादरी याने उडवाउडवीची उत्तर देत मोबाइल बंद केला. त्यानंतर काही महिने तो फरार होता. काही दिवसांपूर्वी रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांचा साहिल कादरी याच्याशी संपर्क झाला.
त्यावेळी त्याने मी कोणतीही रक्कम देणार नाही, मला फोन करून पैसे मागितल्यास तुम्हाला सोडणार नाही. तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रामगोंडा पाटील यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |