08:51pm | Jul 23, 2022 |
चाफळ : चाफळ, ता. पाटण विभागातील सडावाघापूर येथील उलटा धबधबा प्रसिध्द झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरण अन् उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आता याठिकाणी आनंद घेण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता प्रत्येक माणसी वीस रुपये मोजावे लागणार आहेत.
पर्यटकांची वाढती गर्दी पाहता वनविभाग, सडावाघापूर ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितीने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र या शुल्काबरोबर पर्यटकांना सुविधा देणेही गरजेचे असल्याचे मत पर्यटकांनी व्यक्त केले आहे.
सडावाघापूर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय सडावाघापूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने घेतला आहे. चाफळ विभागाच्या पश्चिमेला उंच डोंगर माथ्यावर निसर्गाने मुक्त उधळन केलेले सडावाघापूर पठार आहे. या पठारावरुन धबधबा कोसळतो. धबधब्याचे हेच पाणी पुन्हा उलट्या दिशेने येते असल्याने पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी याठिकाणी गर्दी करत आहेत. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिकांनाही रोजगार निर्माण झाला आहे.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |

दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |