खटाव : धोंडेवाडी, ता.खटाव येथील पेट्रोल पंपानाजिक सूर्याचीवाडी हद्दीत आज सकाळी सहा वाजता चारचाकी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळू मामाच्या मेंढराचे एक देवस्थान लाकरेवाडी येथे असून ओमनी गाडीतून आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी-मायणी रस्त्यावरील सुर्याचीवाडी येथे पहाटे सहा वाजता ही गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. अपघातात एक पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दहीवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे. सर्व प्रवासी सिध्देश्वर कुरोली व बनपुरी येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. पांडुरंग देशमुख यांच्या गाडीतून सर्वजण देवदर्शनासाठी निघाले होते. गाडीची धडक झाडाला एवढी भीषण होती की, गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीचे दोन भाग झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर घटनास्थळी तातडीने पोलीसांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |