कराड : मुलगा दारू पिऊन येऊन मारहाण करून घराबाहेर काढत असल्याच्या कारणावरून बापाने मुलाच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केली. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सचिन विलास मोहिते (वय 48 रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी संशयित बापास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शरद प्रतापराव मोहिते (वय 42, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर प्रतापराव गुलाबराव मोहिते (वय 74, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी प्रतापराव हे रेठरे बुद्रुक येथे पत्नी कमल व मुलगा शरद असे तिघेजण राहत होते. शरदला दारूचे व्यसन होते. तो अतिप्रमाणात दारू पित होता. त्याने दारूसाठी घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही विकलेले होते. तसेच तो दारूच्या नशेत वडील प्रतापराव व आई कमल यांना सतत मारहाण व भांडण करून घराबाहेर काढत होता. शनिवारी पहाटेच्या सुमारासही शरद याने प्रतापराव याना मारहाण करून घराबाहेर काढले होते. त्यानंतर शरद हा प्रतापराव याना मारण्याच्या उद्देशाने अंगावरती आला. म्हणून प्रतापराव यांनी तेथे पडलेल्या काठीने शरदच्या डोक्यात मारले. मात्र घाव वर्मी लागल्याने शरदच्या डोक्यातून रक्त येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर फिर्यादी याने शेजाऱ्यांच्या मदतीने शरद याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तो मयत असल्याचे सांगितले.
याप्रकरणी प्रतापराव मोहिते याच्यावर कराड ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास कराड पोलीस करीत आहेत.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |