कराड : कोल्हापुरहून पुण्याच्या दिशेने निघोलेली कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आटकेटप्पा, ता. कराड येथे सोमवारी सकाळी हा अपघात झाला.
संजय मोहन देवकुळे (वय ५०), सुधीर श्रीरंग भिसे (५६), रंजीता सुधीर भिसे (४५) व साक्षी शेलार (५३, सर्वजण रा. दह्यारी-हवेली, पुणे) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
अपघातस्थळावरुन मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दह्यारी-पुणे येथील चौघेजण कारमधून (क्र. एमएच १२ आरके ४०२१) नागरमुनोळीला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी ते सर्वजण कारमधून पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले. संबंधित कार आटकेटप्पा येथे आली असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार महामार्गाच्या नव्याने बांधलेल्या दुभाजकाला धडकली. ही धडक एवढी भिषण होती की, कारच्या समोरील भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला. तर कारमधील चौघे गंभीर जखमी झाले.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह महामार्गावरील प्रवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल केले. तर दुपारी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार महामार्गावरुन बाजुला घेण्यात आली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |