08:29pm | Apr 14, 2024 |
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाहू चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण सातार्यात झाले ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे. महापुरुषांवर आपत्तीजनक विधाने करणार्या संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावेत यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कठोर कायदे करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
येथील शाहू चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील भीमसागर लोटला होता. सकाळी सात वाजल्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून भीम ज्योती घेऊन येणारे अनुयायी यांनी शाहू चौकात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, दादासाहेब ओव्हाळ, चंद्रकांत खंडाईत, किशोर गालफाडे, तसेच शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, इसाक बागवान यांनी अभिवादन केले.
शाहू चौकामध्ये वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. तेथे भीमवंदना सांगणारी पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांसाठी थंड पाणी आणि न्याहारीची सोयही करण्यात आली होती. शाहू चौक ते तालीम संघ मैदान यादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपालिका समोरील मोकळ्या जागेमध्ये भीमवंदना गाणी लावण्यात येऊन तेथे येणार्या भीमज्योतींचे स्वागत करण्यात येत होते.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत 133 किलोचा केक कापण्यात आला. अरूण जावळे यांच्या संकल्पनेतील एक पेन एक वही या अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील हरित वृक्ष संवर्धन ग्रुपच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक झाड लावा एक हजार रुपये मिळवा, अशी अभिनव स्पर्धा आयोजित केली होती. या उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना तज्ञ म्हणून थोर होते. जर जागतिकदृष्ट्या विचार करता भारतीय राज्यघटनेचा विचार केला तर ती अत्यंत रचनात्मक, व्यापक आणि समाजातील सर्व जाती-जमातींचा विचार करणारी राज्यघटना होती. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभाव जो सांगितला त्याचे प्रतिबिंब भारताच्या राज्यघटनेमध्ये दिसते. डॉ. आंबेडकर यांचे शिक्षण सातार्यात झाले ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. मात्र महापुरुषांच्या संदर्भाने काही स्वार्थी लोक वेगळ्या पद्धतीचे राजकारण करतात. त्यामुळे अशी आपत्तीजनक वक्तव्ये करणार्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. असे कायदे केंद्र शासन, राज्य शासनाने पारित करावेत, अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण सातारा हा डॉ. आंबेडकर झाला होता. सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी भीम गीते आणि भीम वंदना सादर करण्यात आली. राजवाड्यावर वंचित बहुजन आघाडीच्या कलापथकाने या निमित्ताने काही पथनाट्य सादर केली.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |