11:36am | Mar 21, 2024 |
सातारा : २४ मार्च हा दिवस सर्वत्र जगभर जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा होत आहे. जागतिक स्तरावरुन राबविण्यात येणा-या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातून राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर देखील क्षयरोग शोध कामाबाबत देखरेख ठेवली जात आहे.
क्षयरोग हा सुक्ष्मजंतू "मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस " मुळे होतो. जेव्हा फुप्फुसाचा एखादा क्षयरुग्ण खोकतो किंवा शिंकतो यावेळी क्षयरुग्णाच्या तोंडातुन सुक्ष्मथेंब (droplet) बाहेर पडतात. व या सुक्ष्म थेंबामध्ये हे क्षयरोगाचे जंतू असतात. हे सुक्ष्मथेंब हवेत बराच वेळ तरंगत असतात व ज्यावेळी निरोगी व्यक्ति ही हवा नाकाद्वारे आत घेतो, त्यावेळी श्वासातून क्षयरोगाचा जंतू त्या व्यक्तिच्या शरीरात जातो व त्यास क्षयरोगाचा संसर्ग होतो.
भारतातील क्षयरोगाचे परिणाम :
देशात दररोज ४० हजारहून अधिक व्यक्तिंना क्षयरोगाच्या जंतुंचा संसर्ग होतो, दररोज ५ हजार हून अधिक लोकांना क्षयरोग होतो, दररोज १ हजार पेक्षा जास्त रुग्ण क्षयरोगामुळे मरण पावतात तसेच आपल्या देशात दर ३ मिनिटास २ रुग्ण मरण पावतात.
जिल्हाची दरवर्षी सातारा जिल्हयामध्ये ३ हजारांपेक्षा जास्त क्षयरुग्णांना उपचार दिला जातो. यापैकी १४०० पेक्षा जास्त क्षयरुग्ण हे नविन थुंकीदुषित असतात व उरलेले थुंकीअदुषित असतात. या नविन थुंकीदुषित क्षयरुग्णांमधील साधारणतः ६% क्षयरुग्ण मृत्यू पावतात. नवीन क्षयरुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८५ ते ९०% दरम्यान आहे. क्षयरोग हा हवेतुन पसरणारा आजार असलेने या आजाराचे जंतू कोणाच्याही शरीरात प्रवेश करु शकतात व क्षयरोग होऊ शकतो.
क्षयरोगाचे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण होते.
1)फुप्फुसाचा क्षयरोग 2) फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग.
फुफुसाच्या क्षयरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे :
दोन आठवडयांपेक्षा जास्त काळ खोकला, हलकासा परंतु सायंकाळी वाढणारा ताप (हाड्या ताप), भूक मंदावणे, छातीत दुखणे, काही गंभीर क्षयरुग्णांच्या बेडक्यातून रक्त पडते, वजन कमी होणे.
तसेच एच. आय. व्ही बाधीत किंवा मधुमेही रुग्णांमध्ये एक दिवसाचा खोकलादेखील क्षयरोगाचा असू शकतो, धुंकीदुषित रुग्णाचा सहवासीत, कुपोषित, दारुचे व्यसन
फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग :
गंडमाळा (लसिका ग्रंथी) मानेवर सुज व गाठी येतात कधीकधी यामधून पू बाहेर येतो. मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग (मेनिनजायटीस) :- डोकेदुखी, ताप, ग्लानी, मानेचा ताठपणा इत्यादी यात क्षयरोगाची लक्षणे आढळतात.
मणक्याचा क्षयरोग :
क्षयरोगाचे निदान मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्रामध्ये (डीएमसी) बेडका तपासणी करणे हे क्षयरोग तपासणीचे प्रमुख साधन आहे. दोन आठवडयांपेक्षा जास्त काळ खोकला असल्यास नजीकच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडका नमुना घेण्याची व्यवस्था आहे. (सातारा जिल्हयात ६१ ठिकाणी सुक्ष्मदर्शक केंद्र आहेत.)
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची उद्दीष्टे :
नवीन सापडलेला स्यूटम पॉझिटिव्ह रुग्णाचे बरे होणेचे प्रमाण ९०% पेक्षा जास्त साध्य करणे, अपेक्षित स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णांपैकी किमान ९०% शोधून त्याची नोंद करणे, डॉट उपचार पध्दत आपले नजिकच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. जर रुग्णास प्रथमच क्षयरोगाची बाधा झाली असेल तर अशा क्षयरुग्णास कॅट-१ सुरु करण्यात येते. नविन धुंकीदुषित, नविन चुंकीअदुषित (एक्स रे दुषित), नविन फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग इत्यादी क्षयरुग्णांना ६ महिन्यंचा कॅट-१ उपचार दिला जातो. या क्षयरुग्णांना प्रत्यक्ष निरिक्षणाखाली उपचार दिला जातो. यालाच ९९ डॉट्स (DOTS) म्हणतात.
ज्या क्षयरुग्णांनी पूर्वी एकदा क्षयरोगाचा उपचार घेतला आहे. अशा क्षयरुग्णांना रोगाचा पुनउर्दभाव झाला आहे, अशा क्षयरुग्णांना डॉट्स मधील कॅट-२ उपचार दिला जातो हा उपचार ८ महिन्यांचा आहे.
क्षयरोग व एचआयव्ही :
क्षयरोगाचा उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णांची एचआयव्ही तपासणी करणेत येते. क्षयरुग्ण एचआयव्ही बाधित असल्यास त्यास एआरटी सेंटरकडे उपचारासाठी पाठविले जाते. व रुग्णास एचआयव्ही व क्षयरोगाची औषधे सुरु ठेवण्यात येते. एचआयव्ही बाधित रुग्णाचा क्षयरोग पूर्ण बरा होतो. एम.डी. आर. क्षयरोग (मल्टी ड्रग रेझिस्टंस क्षयरोग) व डॉटस प्लस उपचार.
सद्या नव्या प्रकारचा क्षयरोग मनुष्यहानी करणेसाठी उतावीळ आहे तो म्हणजे एम.डी. आर (Multi Drug Registant) क्षयरोग उपचार सुरु केल्यानंतर बरेचसे क्षयरुग्ण उपचार व्यवस्थित न घेता धरसोड करतात. व्यसनाधिन होतात, औषधोपचार पुर्ण व वेळेत न घेतल्यास क्षयरुग्णाच्या शरीरातील जंतु स्तः मध्ये बदल घडवून आणतात व सद्या डॉटस उपचारातील औषधे (फस्ट लाईन अॅटी औषधे) या जंतुला मारण्यात नाकाम ठरतात. अशा क्षयरोगाला एम.डी.आर. क्षयरोग म्हणतात. या क्षयरुग्णाना पुढे डॉटस प्लस उपचार देणेसाठी ह्या जिल्हयामध्ये अशा क्षयरुग्णांचा शोधकाम सुरु आहे, या डॉटस प्लसचा उपचार दोन वर्षाचा असेल.
क्षयरोगाबाबत खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांना अधिसूचना :
सरकारी दवाखान्यात उपचार घेणारे क्षयरुग्ण वगळता खाजगी वैद्यकिय व्यवसायीक यांचेकडे असणाऱ्या क्षयरुग्णांबाबत देखील यापूढे देखरेख रहाणेसाठी केंद्रसरकार मार्फत खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांना अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार जे खाजगी वैद्यकिय व्यवसायीक क्षयरोगाचा उपचार करणार आहेत. त्यांनी क्षयरुग्णांची यादी जिल्हा क्षयरोग केंद्र सातारा या कार्यालयास देणे बंधनकारक आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची वेळोवेळी देखभाल घेणे सोईचे जाईल.
क्षयरुग्णांनी काय करावे :
मुळात क्षयरोग झाला म्हणुन घाबरु नका हा आजार सरकारी दवाखान्यात ६ ते ८ महिन्यांच्या उपचाराने बरा होतो, हा उपचार पूर्ण मोफत उपलब्ध आहे, प्रत्येक रुग्णासाठी ६ ते ९ महिनेंचे औषधोपचार अखंडीत सुरु ठेवणेत येतो, खोकताना किंवा शिंकताना तोडावर आठवणीने रुमाल धरावा. इतरत्र कोठेही धुंकु नये. त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो, सुरु असणारा औषधोपचार पूर्ण करा, मध्येच धरसोड केल्यामुळे जंतु औषधांना दाद देत नाही हि बाब लक्षात ठेवा, चालु वर्षी दिनांक २४ मार्च, २०२४ रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यासाठी घोषवाक्य
" YES I WE CAN END TB" ("होय आपण टीबीचा अंत करु शकतो").
क्षयरोग निर्मुलनाचे वचनपुर्ती करण्यासाठी , क्षयमुक्त जगासाठी, सर्व क्षयबाधितापर्यंत पोहचण्यासाठी, तुम्ही क्षयबाधित आहात का ? हे तपासण्यासाठी, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्यासाठी, प्रधानमंत्री टी. बी. मुक्त अभियान राबवणे, टी.बी. मुक्तग्रामपंचायत करणे.
या घोषवाक्यातुन क्षयरोगाबाबत जनजागृती करुया व आपला सातारा जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यास मदत करु, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी सातारा यांनी केले. -संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |