कराड : शहर परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलिसांनी त्याविरोधात कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. त्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या संशयितांवर सरसकट प्रतिबंधात्मक कारवाई होण्याचे संकेत आहेत.
त्याचाच भाग म्हणून पोलिसांनी सहा महिन्यांत तब्बल ८०० संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अवघ्या आठ महिन्यात गुंडाच्या तीन टोळ्यांसह पोलिस रेकॉर्डवरील दहा जणांना सलग दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
शहरातील अद्यापही काही टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आहेत, तर काही प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यासोबत आगामी लोकसभेच्या दृष्टीनेही पोलिसांनी राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून गुन्हेगारांच्या हालचालींच्या नोंदी घेण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गुन्हेगारीवर पोलिसी वचक बसेल, अशी अपेक्षा आहे.
शहर परिसरात वाढत्या गुन्हेगारीची स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी सरसकट संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली आहे. डीबीने आजअखेर तब्बल ८०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. फौजदार राजू डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांसह अन्य पोलिसांनाही कारवाईत हातभार लावला आहे.
वर्षा-दीड वर्षात तीन टोळ्या हद्दपार झाल्या आहेत. त्यापूर्वी सोळवंडेच्या टोळीला जुलै २०२० तर झेंडेच्या टोळीला जानेवारी २०२१ मध्ये हद्दपार केले आहे. गुंड जुनेद शेखच्या टोळीला २०२२ मध्ये हद्दपार केले आहे.
जुनेदच्या टोळीतील आमीर शेखवर यापूर्वी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यानुसार स्थानबद्धतेची जिल्ह्यातील दुसरी कारवाई झाली आहे. तीन टोळ्यांतील १७ जण दोन वर्षांसाठी हद्दपार आहेत. अन्य गुन्ह्यातील नऊ संशयित स्वतंत्रपणे हद्दपार आहेत.
आगामी लोकसभेसह अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अजून कारवाईचा फास आवळणार आहेत. त्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर थेट प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.
त्याचा आराखडा पोलिसांनी आखला आहे. त्यामुळे काही राजकीय संशयितांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी काही टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे दाखल केले आहेत.
त्यावरही लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त आणखी १० जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल आहेत. त्याचाही निकाल होणार असल्याने शहरातील गुन्हेगारी क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत.
कराड शहरात डीबीने सहा महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. फौजदार राजू डांगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाईत गती आल्याचे दिसते. त्यात डीबीने वर्षानुवर्षे फरार असलेले आठ संशयित आरोपी त्यांनी गजाआड केले आहेत. त्याशिवाय तीन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल पावणेचार किलोचा गांजा त्यांनी जप्त करून त्यात पाच जणांना अटक केली आहे. डीबीने आजअखेर ३१ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातही काहीजणांना अटक आहे. चोरीस गेलेले ३५ मोबाईल संचही पोलिसांनी जप्त केले आहेत. शहर परिसरात अवैध पिस्तूल तस्करी
करणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून पिस्तूलही जप्त केले आहे. शहर परिसरात झालेल्या जबरी चोरीचे चार गुन्हेही डीबीने उघड केले आहेत.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |