08:56pm | Apr 24, 2024 |
सातारा : नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची ज्या पद्धतीने आधीच तयारी करता, तशीच तयारी करून वाट न पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपच्या आजी माजी पदाधिकार्यांना केल्या.
लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी, भाजप माजी नगरसेवक, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य, वृक्ष समिती सदस्य, शिक्षण मंडळ सदस्य आणि घटक पक्षांच्या पदाधिकार्यांच्या लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार कांताताई नलावडे, माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, माजी नगरसेवक अविनाश कदम, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, शिरीष चिटणीस, अमर गायकवाड, निशांत पाटील, निलेश मोरे, अशोक मोरे, रंजना रावत, गीतांजली कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, सुजाता राजेमहाडिक, आशा पंडित तसेच आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने लोकोपयोगी असंख्य निर्णय घेतले आहेत. त्याचा लाभ सातारा शहरासह जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना मिळतो आहे. विरोधक खोटेनाटे आरोप करत सुटले आहेत. नगरसेवकांनी टीम घेऊन कामाला लागावे. नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने काम करता, तसेच नियोजनाची वाट न पाहता काम सुरू करा. भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. आमचा शब्द कधी पडू दिला नाही. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर भाजपला ताकद देणे ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. संघर्षामुळे दोन्हीकडे नुकसान होते हे लक्षात आलेले आहे. आज काही पालिकेची निवडणूक नाही तर लोकसभा निवडणूक आहे. मोदींचा बहुमान करण्यासाठी उदयनराजेंना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
पक्ष संभाळता आला नाही, त्यात भाजपचा काय दोष?
राजकारण म्हटलं की साम दाम दंड भेद या सर्व नीती वापराव्या लागतात. महाविकास आघाडीचे नेते पक्षफोडीचा आरोप भाजपवर लावतात. परंतु त्यांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना सांभाळता आले नाही त्यात भाजपचा काय दोष आहे ? असा सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला.
देगाव एमआयडीसी का रोखली ते सांगा?
जिल्ह्यामध्ये मोठी एमआयडीसी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उभे असलेल्या उमेदवाराने आटापिटा करून देगाव एमआयडीसी होण्यापासून रोखली. विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून शेतकर्यांच्या जमिनीवरचे शिक्के उठवले गेले. वास्तविक डोंगराळ जमिनी चांगला मोबदला देऊन एमआयडीसीसाठी घेतल्या जाणार होत्या. परंतु मोर्चे काढून, निवेदन देऊन त्यांनी एमआयडीसी रोखली. निगडी, वर्णे येथील प्रस्तावित एमआयडीसीलाही विरोध केला होता. परंतु आम्ही मध्यस्थी केल्यामुळे तिथले शिक्के उठवले गेले नाहीत. एमआयडीसी चा प्रकल्प का रोखला याचे उत्तर विरोधकांनी द्यावे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |