11:34am | Apr 24, 2024 |
कराड : कराडनगरीचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाईच्या चैत्री यात्रा महोत्सवास आज मंगळवारपासून पालखी मिरवणुकीने दिमाखात शुभारंभ झाला. सहा दिवस चालणाऱ्या यात्रेचा शनिवार (दि. २७) हा मुख्य दिवस असून, प्रथेप्रमाणे नित्याने पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज सायंकाळी उशिरा श्रीकृष्ण दत्तात्रय आवटे (पुजारी) यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली आणि कृष्णामाई यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. सुवासिनींनी पूजन केल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. कृष्णा-कोयना नद्यांच्या अपूर्व प्रीतिसंगमावर कृष्णा घाटावरील मंडपात पालखी येऊन विसावली. दरम्यान, कराडकर नागरिक व कृष्णामाईच्या भक्तांनी दर्शन घेण्यासह आपली उपस्थिती दर्शवली. सालाबादप्रमाणे मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
दिवसीय कृष्णाबाई यात्रा महोत्सवातील उर्वरित पाच दिवसात उद्या बुधवारी (दि. २४) मंगलप्रभात समयी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री दिलीप गुरव यांच्या हस्ते ‘नवचंडी याग’ संपन्न होईल. दुपारी तीन वाजता भजन, सायंकाळी सात वाजता ‘गीत रामायण’ कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवारी (दि. २५) दुपारी चार वाजलेपासून भजन, सायंकाळी ‘सुनहरी यादे’ कार्यक्रम. शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी चार वाजता हळदी कुंकू. सायंकाळी भजन होणार आहे.
शनिवार (दि. २७) यात्रेचा मुख्य दिवस असून, सायंकाळी चार वाजता भजन होणार आहे. रविवारी (दि. २८) सकाळी ढोल ताशांच्या गजरात कृष्णाबाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. ही मिरवणूक मंडपात आल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन, वसंतपूजा व रात्री येसूबाईच्या यात्रेने कृष्णाबाई यात्रा महोत्सवाची सांगता होईल.
यात्रेनिमित्त जुने कृष्णाबाई सांस्कृतिक केंद्रात महाप्रसाद तर कृष्णाघाटावरील मंडपात बुंदी वाटप असेल. तरी, भाविकांनी यात्रेतील कार्यक्रम व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृष्णाबाई उत्सव समितीचे अध्यक्ष आनंदराव पालकर यांनी केले आहे.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |