05:14pm | Apr 07, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा विविध कंपन्यांनी ठोस उपाय योजना सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असणाऱ्या कंपन्या सुरू ठेवून बाकीच्या बहुतांशी कंपन्या बंद ठेवल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला खो बसला आहे. दरम्यान, येत्या १५ दिवसात कोरोनोसंदर्भात परिस्थिती न बदलल्यास विविध उत्पादनांची परदेशात निर्यात कशी करायचा असा प्रश्न उद्योजकांना पडला असल्यामुळे औद्योगिक वसाहतीवर कोरोनाची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीमध्ये उत्पादित केलेला माल निर्यात करू न शकल्यास त्याचा कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, की सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये कवित्सू, कूपर, परांजपे ऑटो, मेडीस्प्रे, मुथा, अल्फा लवाल, टॉप गिअर, असुवरा, काटदरे, सानिका स्टूल या मोठ्या कंपन्यांसह शेकडोंच्या संख्येने छोट्या कंपन्या कार्यरत आहेत. विविध कंपन्यांमध्ये साधारण तीस हजार पेक्षा अधिक कामगार काम करतात. विविध कंपन्यांमध्ये गिअर बॉक्स, बेरिंग, कपलिंग, विविध औषधासह चटणी, लोणचे आदींचे उत्पादन घेतले जाते. बहुतांश कंपन्या आपली उत्पादने युरोप, अमेरिका, कॅनडा, थायलँड व्हियतम, कोरिया, दुबई सौदी अरेबिया, रशिया, पाकिस्तान आदी देशांमध्ये निर्यात करतात. औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या तर १०० टक्के उत्पादन परदेशांमध्ये निर्यात करीत असतात. सातारा येथून कंटेनरच्या माध्यमातून मुंबई व तेथून जहाज अथवा विमानाने निर्यात केली जाते. सध्या जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. त्याचा भारतालाही फटका बसला असून महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे येथे त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव पाहायला मिळाला आहे. राज्यातील संभाव्य परिस्थिती पाहता सातारा जिल्हा प्रशासनाने सर्व त्या उपायोजना केल्या असून जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. सातारा जिल्ह्यातील रेल्वे, बससेवेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीवर त्याचा काय परिणाम झाला याचा कानोसा घेतला असता विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर उपायोजना राबविल्या असल्याची माहिती मिळाली. सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या उत्पादित केलेल्या मालाची निर्यात करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सद्यपरिस्थितीत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवणा-या कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कंपन्या विविध उपाययोजना करत असून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रवेशद्वारावरच हात स्वच्छ धुऊन कंपनीमध्ये प्रवेश दिला जात आहे. ३१ मार्पर्यंत व्हिजिटर्सना कंपन्यांना भेटी देण्यास बंदी घालण्यात आली आहे. मार्केटिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना सद्यपरिस्थितीत कोणत्याही कंपन्यांना भेटी देऊ नका अशा सूचना करण्यात आल्या आहेत. थोडक्यात येत्या पंधरा दिवसात परिस्थिती न बदलल्यास औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाची टांगती तलवार राहणार असल्याचे स्पष्ट होते. १४ एप्रिल पर्यंत कंपन्या सुरू न झाल्यास कामगारांच्या पुढे मात्र जीवनमरणाचा प्रश्न उभारणार असल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |