राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरूध्द शिवसेना कोणाला मैदानात उतरवणार हे कोणत्याही क्षणी जाहीर होईल. मात्र सुरूवातीपासूनच मानापमान नाट्यात अडकलेल्या राष्ट्रवादीविरूध्द पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी केलेल्या युतीमध्ये साताऱ्यात राज्यातील लक्षवेधी लढत होणार आहे. काहीही करून साताऱ्यात १९९६ ची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार शिवसेना - भाजप युतीने केला असून त्यादृष्टीने मजबुत व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे सातारची लढत एकतर्फी होईल अशा आशेवर बसलेल्यांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ऐकून ४८ पैकी सातारा हा ४५ वा मतदारसंघ आहे. सातारा - जावली, वाई - महाबळेश्वर - खंडाळा, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. पैकी सातारा - जावली, वाई - महाबळेश्वर - खंडाळा, कोरेगाव, कराड उत्तर या चार जागी राष्ट्रवादीचे, कराड दक्षिण काँग्रेसचे व पाटणमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. मतदारसंघात एकुण मतदार १८ लाख २३ हजार ४७६ आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार ९ लाख २८ हजार ६२०, तर स्त्री मतदार ८ लाख ७४हजार ८४० इतके आहेत.
क्रांतीसिंह नाना पाटील, देशभक्त किसन वीर, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वाची तेजस्वी परंपरा या मतदारसंघाला लाभली आहे. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव भोसले या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. १९९६ पर्यंत १२ वर्षे ते साताऱ्याचे खासदार होते. मात्र १९९६ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इतिहास घडला. सातारच्या काँग्रेसच्या अभेद्य गडाला शिवसेनेने भगदाड पाडले. शिवसेनेचे हिंदुराव नाईक - निंबाळकर येथून विजयी झाले. त्यावेळी काँग्रेसचा तर पराभव झालाच, पण ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवलेले उदयनराजे भोसले तिसऱ्या क्रमांकावर गेले. त्याच दणदणीत विजयाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार युतीने केला आहे.
१९९६ पासून जिल्ह्यात शिवसेनेची खास व्होट बँक लोकांच्या नजरेत आली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसली. इतकेच नव्हे, तर १९९९ व २००४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीचे उमेदवार लक्ष्मणराव पाटील यांना कडवी लढत देऊन विजयासाठी झुंजायला लावले. लक्ष्मणराव पाटील काठावर पास झाले. आधी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा १९९९ पासून, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. २००९ पासून उदयनराजे भोसले सातारचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र यावेळी त्यांना स्वकियांच्या प्रचंड नाराजीला सामोरे जावे लागले. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये उदयनराजे यांनी साताऱ्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित असतानाही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराने हजेरी लावली नाही. ठरवून विरोध नोंदवला. उदयनराजे यांना उमेदवारी नको म्हणून स्वपक्षियांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या बाजुने कौल देऊन आमदारांची समजुत घातली. तथापि, आता शरीराने उदयनराजे यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार किती मन लावून त्यांचे काम करतात, काँग्रेस कितपत मनापासून साथ देते याकडे युतीचेही बारीक लक्ष आहे.
मतदारसंघात आमदारांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ उदयनराजे यांच्यावर आली असतानाच संपर्काचा अभाव, विकासकामांची वानवा यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी आहे. मतदार सक्षम पर्यायाच्या शोधात आहेत. गतवेळी शिवसेनेने ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली होती. आता भक्कम पर्याय घेऊन परिवर्तन करण्याच्या निश्चयाने युती मैदानात उतरत आहे. त्यादृष्टीने युतीने रणनिती आखली आहे. शिवसेनेचा उमेदवार कोण असणार याकडे केव सातारकरांचेच नव्हे, तर राज्यातील जनतेचे डोळे लागले आहेत. आता कोणत्याही क्षणी उमेदवार जाहीर होईल. गतवेळेपेक्षा युतीची ताकद वाढली असून इतर काही घटकही निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे सातारची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
- गजानन चेणगे
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |