03:13am | Sep 04, 2018 |
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांचे पडघम जिल्हाभरात वाजू लागले आहेत. स्वत:चे पुनर्वसन करण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. यापैकीच एक म्हणजे विधान परिषद सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर. जिल्ह्याचा मालक मीच, या सरंजामशाही तोर्यात ते नेहमी वावरत असतात. परंतू सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. उदयनराजे सोडल्यास मिस्टर रामराजेंना जमिनीवर आणण्याचे काम जिल्ह्यातील इतर कोणताही पुढारी करीत नाही. त्यामुळेच मिस्टर रामराजेंची दादागिरी सातारा जिल्ह्यात वाढलेली आहे. खा. उदयनराजेंना येनकेन प्रकारे अडचणीत आणण्याचे नानाविध प्रयत्न मिस्टर रामराजेंनी वेळोवेळी केले. मात्र दरवेळी खा. उदयनराजे रामराजेंना पुरुन उरले, हे वास्तव आहे. आज गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजेंनी रामराजेंचा बालेकिल्ला असलेल्या फलटणमध्ये जावून रामराजेंचे कनिष्ठ बंधू रघुनाथराजे नाईक-निंबाळकर व संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या घरात जावून त्यांनी छत्रपतींच्या गादीचा दरारा दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच त्यांना स्वकियांनी त्रास दिला होता. त्यामुळे स्वराज्य स्थापन करायचे असेल तर प्रथमत: स्वकियांचा बंदोबस्त करावा लागेल, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताडले होते. जावलीचे चंद्रराव मोरे, फलटणचे नाईक-निंबाळकर, रांझ्याचा पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी बाधक ठरले असता त्यांनी त्यांचा बंदोबस्त करुन स्वराज्याची गुढी उभारली होती. उणीपुर्या बारा पिढ्या होवून तेराव्या पिढीपर्यंत हा संघर्ष सुरु आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक संस्थाने, राजे-रजवाडे खालसा झाले. परंतू सातारच्या छत्रपतींच्या गादीबद्दल महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्तानाला एक वेगळा आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजेही आपल्या लौकिकाला साजेसे कार्य करीत असतात. जात-पात न मानता प्रत्येकाच्या सुखदु:खात ते शरीक होतात. खा. उदयनराजेंना प्रथमपासूनच राजकीय संघर्ष सोसावा लागला आहे. 1999 ची विधानसभा निवडणुक ऐन रंगात आली असताना शरद लेवे खून प्रकरणात नाव आल्याने त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला होता.
हातातोंडाशी आलेला घास त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आला. परंतू हे दु:ख सुद्धा पोटात घालून ते राजकीय रणांगणात उतरले. 2009 साली त्यांचा राजकीय विजनवास संपला आणि मोठ्या मताधिक्क्याने ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेले. परंतू खा. उदयनराजेंच्या खासदारकीमुळे अनेकांना पोटशुळ उठला. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळले. आणि याच संधीचा फायदा जिल्ह्यातील काही राजकीय चोरांनी घेतला. लायकी नसताना एखादे संविधानिक पद मिळाल्यावर त्याचे दमण कसे करायचे, याचे उत्तम उदाहरण सध्या जिल्हा याची देही, याची डोळा पाहत आहे. गिरे तो भी टांग उपर या उक्तीप्रमाणे मिस्टर रामराजे सध्या जिल्हाभरात वागत आहेत. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढावी, यासाठी तन-मन-धनाने राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या पाठिशी ते उभे होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्यात माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. पण राष्ट्रवादीतील आयत्या बिळावर नागोबा झालेले काही लोक राष्ट्रवादीत राहून सरंजामी वकुब राबवित आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, शिवेंद्रराजे हा सरंजामी वकुब निमुटपणे सहन करीत आहेत. वेळ आल्यास यांनाही पायदळी तुडवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, अशी सरंजामी वृत्ती जिल्हा राष्ट्रवादीत बाळसे धरु लागली आहे.
मै खडा तो सरकार से बडा, या नितीनुसार खा. उदयनराजेंचे राजकारण प्रथमपासून राहिलेले आहे. सातारा लोकसभेच्या गत दोन्ही निवडणुकांमध्ये खा. उदयनराजे विक्रमी मतांनी निवडून आलेले आहेत. कदाचित याच गोष्टीची सल मिस्टर रामराजेंना लागली असावी. 2009 च्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत मिस्टर रामराजेंना उपरे व्हावे लागले. त्यामुळे मान डोलवणार्या नंदी बैलाची प्रतिष्ठापना करुन शरद पवारांच्या जिवावर हे आजतागायत तग धरुन आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मिस्टर रामराजेंनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. परंतू अकलुजच्या मोहिते पाटलांनी व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी आयात ब्याद नको म्हणून मि. रामराजेंचा पत्ता कट केला होता. शरद पवारांच्या मेहरबानीवर मिस्टर रामराजे सोन्याच्या पिंजर्यात बसून सत्तेची ऊब चाखत आहेत. परंतू येणार्या काही दिवसांत या उबीचे रुपांतर धगीमध्ये होणार आहे, याची पुरेपूर कल्पना त्यांना आलीच असावी.
खा. उदयनराजेंचे जिल्ह्यातील वाढते प्राबल्य पाहून मि. रामराजेंना त्यांची प्रथमपासूनच आसुया वाटत होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर हा संघर्ष टोकाचा पेटला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात खालची भाषा वापरल्यामुळे जिल्ह्याभरातील दोन्ही गटांमध्ये प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले होते. खा. उदयनराजे विरुद्ध मि. रामराजे हा कलगीतुरा संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. विधान परिषदेच्या सभापतींची ताकद काय असते, हे गेल्या पन्नास वर्षात कोणीही पाहिली नसेल. या पदाची गरिमा आणि प्रतिष्ठा काय असते, या संदर्भात राज्य शासनाने एक आयोग स्थापन करावा. त्या आयोगाच्या चौकशीत भविष्यात हे पदच विसर्जित करण्यात यावे, असाच शेरा दिला जाईल, याबाबत दुमत नसावे.
खा. उदयनराजे मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने फलटणमध्ये येवून गेले. तुमच्यामुळे या कुत्र्यांचं फावतंय, या बांडगुळांना त्यांची जागा दाखवून द्या, असे फलटणमधील जनतेला उद्देशून खा. उदयनराजे गरजले होते. मि. रामराजे व त्यांच्या दोघा बंधूंचे नाव न घेता आज फलटणमध्ये आलोय, उद्या तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला होता. परवा मि. रामराजेंनी खाली मन लागत नाही, आता वर जावेच लागेल, असे सुतोवाच केले होते. तसेच माझ्या जिविताला धोका आहे, असेही विधान केले होते. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजेंनी फलटणवर स्वारी केली व मि. रामराजेंचे कनिष्ठ बंधू असलेल्या रघुनाथराजे व संजीवराजे यांच्या निवासस्थानावर जावून तुमच्या घरापर्यंत आलोय, हा फलटणकरांना दिलेला शब्द तंतोतंत पाळला. त्यामुळे फलटण तालुक्यात कही खुशी कहीं गम, असे वातावरण निर्माण झाले होते. काहींना उकळ्या फुटल्या, तर काहींची तंतरली. मात्र, उदयनराजेंनी पुन्हा एकदा आपल्या बेधडक स्वभावाची चुणूक संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली आहे.
- संग्राम निकाळजे
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |