03:55pm | Apr 29, 2018 |
सातारा : राजकारणात कोणीही कोणाचे शत्रू अथवा मित्र कायमस्वरुपी राहत नाही, याची अनेक उदाहरणे राजकीय पक्षात पहावयास मिळतात. जातीयवादी पक्षापासून दूर व्हा, असे सांगणार्या नेत्याच्या हातात कमळ आले, तर धनुष्यातील बाण बाजुला ठेवून हातात घड्याळ बांधणारेही कमी नाहीत. अशा जावली तालुक्यात आमदारकीच्या नामावलीमध्ये तूर्त तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नावे पुढे आली आहेत. तरीही जावलीतील कदमांची कुदळ पवारांच्या जिव्हारी लागली आहे. तर राजकीय वैर्यांच्या नशीबी आता पक्की यारी केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे.
सातारा शहरातील सदरबझार याठिकाणी एका विकासकामाच्या भूमिपूजनाप्रसंगी राष्ट्रवादीचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जाणीवपूर्वक भाजपमध्ये प्रवेश केलेले युवानेते अमित कदम यांच्या हाती भूमिपूजनाची कुदळ देवून जावली-सातारा आमदारकीच्या यादीत त्यांचे नाव पुढे आणले. या घडामोडीमुळे भाजप पक्षातील आमदारकीचे दावेदार जि.प. सदस्य दीपक पवार हे अस्वस्थ झाले. परंतू लढावू बाण्यामुळे त्यांनी ते दाखवून दिले नाही. कदमांची कुदळ ही त्यांनी जमिनीवर मारली, का स्वत:च्या पायावर मारली? ते येणारा काळच ठरवेल. परंतू दोनच दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची भेट घेवून दीपक पवार यांनी गोगवे येथील समाजमंदिराला जिल्हा परिषद सेस फंडातून दुरुस्तीसाठी निधी देण्याची जोरदार मागणी केली. या मागणीमुळे मानकुमरेसुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. गोगवे हे अमित कदम यांचे गाव आहे. तर त्यांना कुदळ मारण्यास लावणारे खा. श्री. छ. भोसले यांचे व मानकुमरे यांचे राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही चाणक्यनिती जावलीत नवीन नाही. यापूर्वी जावली दूधसंघाच्या निवडणुकीत पवार-मानकुमरे यांनी एकत्र येवून त्यावेळी शशिकांत शिंदे यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. सध्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी हभप सुहासगिरी यांनी जवळीक साधली आहे. दीपक पवार यांनीही राजकीय मतभेद विसरुन मानकुमरेंशी जुळवून घेतल्यामुळे जावलीत चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. सध्या भाजपमध्ये दीपक पवार यांचे चांगलेच वजन वाढले आहे. पण त्यांच्यासोबत आलेले काहीजण पक्षबदलू कार्यकर्ते म्हणून तालुक्याला परिचित आहेत. त्यांच्यापेक्षा मानकुमरेंची जवळीक साधल्यास विरोधाची धार तरी कमी होईल, याबद्दल भाजपचे कार्यकर्तेसुद्धा ठामपणाने सांगू लागले आहेत.
जावली तालुक्यात पूर्वी दिवंगत भि. दा. भिलारे गुरुजी, माजी आमदार लालसिंगराव शिंदे, जी. जी. कदम, माजी सभापती साहेबराव पवार व त्यानंतर सदाशिव सपकाळ, शशिकांत शिंदे यांचा तुल्यबळ गट होता. सध्या आमदार शिंदे हे हुमगाव व्हाया कोरेगाव मतदारसंघात स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे जावलीतील नेतृत्वाचे दोन्ही राजेंच्या वाड्यावर विलीनीकरण झाले आहे, अशी खंत कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. अशावेळी पवार-मानकुमरे यांची यारी अपेक्षित असली तरी मानकुमरे त्याला म्हणावा असा प्रतिसाद देवू शकत नाहीत. कारण लोकसभेसाठी ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत आणि शिवसेना वरिष्ठ नेते त्यांना खासदारकी लढविण्याचा आग्रह करीत आहेत. अशावेळी राजकीय भूमिका घेताना आपली ‘मान’ अडकणार नाही ना, याची त्यांना काळजी घ्यावी लागत आहे. दरम्यान, मानकुमरे हे उपाध्यक्ष असल्यामुळे सगळ्याच पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य त्यांना भेटण्यासाठी येतात. यामध्ये राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |