कोव्हीड 19 जागतिक महामारीमुळे पूर्वी कधीच पाहिल्या नाहीत, ऐकल्या नाहीत व अनुभवल्या नाहीत अशा गोष्टी आपल्या नित्याचाच एक भाग बनून राहिल्या आहेत. असे एकही क्षेत्र राहिले नाही ज्याला या महामारीचा फटका बसला नाही. पण सर्व शिक्षक बंधुभगिनींच्या माध्यमातून व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रयत्नांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. खडू, फळा यामध्ये अडकलेल्या शिक्षणाला डिजीटल तंत्रज्ञानाने कितीतरी चांगले बदल देखील घडून आले आहेत.
स्मार्ट शिक्षण देणारे शिक्षक व विद्यार्थी हळूहळू यात रमू लागले. आलेल्या संकटांचा सामना करण्याची धिटाई त्यांच्यात आली. मान्य आहे ऑनलाईन शिक्षणास मर्यादा आहेत. तो प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांच्यात रममान होऊन शिकवणार्या गुरुजनांसाठी पर्याय ठरत नाही पण सामाजिक अंतर राखत विद्याथ्यांच्या जिविताचे रक्षण करून त्यास शिक्षण प्रवाहात अखंड ठेवण्यासाठी असे प्रयोग करणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर राखताना विद्यार्थ्यांच्या हदयातील शिक्षकाचे अंतर कमी होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण सध्या तरी योग्य पर्याय ठरत आहे.
ऑनलाईन शिक्षणादरम्यान पालकांची जबाबदारी फारच वाढली आहे. प्रथम पालकांनी ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना समजून घेऊन आपल्या पाल्याचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. केवळ स्मार्ट फोन नाही म्हणून त्यास नाराज होऊ देऊ नका त्याला अन्य पर्यायांची ओळख करून द्या. जसे की रेडीओ, टी.व्ही., वृत्तपत्रे, साधे फोन इत्यादी आपण त्याच्या शिक्षकांना अधूनमधून फोन करून आपल्या पाल्यांच्या शंकाचे निरसण करू शकतो. त्यासाठी आपले शिक्षक मित्र सदैव तयार आहेत.
नेटवर्कची समस्या असल्यास आपण नेट जेथे उपलब्ध आहे तेथून ऑफलाईन व्हीडीओ, ऑडीओ डाऊनलोड करून वेळ मिळेल तसा त्यास दाखवू शकता ऐकवू शकता. अनेक विषय तज्ञांचे व्हीडीओ, ऑडीओ गुगलवर उपलब्ध आहेत. पालक म्हणून आपण या पर्यायांची माहीती करून आपल्या पाल्यास शिक्षण प्रवाहात ठेवा. ज्यावेळी त्याच्या हातात स्मार्टफोन असेल त्यावेळी बारकाईने लक्ष ठेवा. त्यांना चुकीच्या गोष्टी पाहण्यास व डाऊनलोड करण्यास प्रतिबंध करा. त्याच्या मोबाईल हाताळण्याची पद्धतीत योग्य तो बदल घडवा. त्याचे डोळे व कान सुरक्षित राहतील असे सेटींग त्यास समजून द्या अथवा आपण करून द्या. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शिक्षण विभाग सतर्क आहे विविध प्रयोग व माध्यमांचा वापर करून विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्याचा व त्यास दर्जेदार शिक्षण देण्याचा सतत सातत्याने प्रयत्न चालू आहे. त्यामुळे पालक म्हणून आपण आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत भीती बाळगू नये असे वाटते.
सध्या आपली मुले घरात आहेत त्यांना शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे द्या. त्यांचे आरोग्य जपा, योगाचे तसेच व्यायामाचे महत्व समजावून द्या, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यास आनंदी ठेवा, त्यास वाचनाची गोडी लावा, घरात एखादे वृत्तपत्र सुरु करा, चांगल्या बातम्यांचे संकलन करण्यास प्रवृत्त व प्रोत्साहित करा, अनंत संकटे आली तरी त्या संकटावर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तीमत्वाची ओळख करून द्या, संगीत, नृत्य, वाचन व वादन यासारख्या कला आयुष्य आनंदी ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
आपल्या पाल्यातील सुप्त गुण ओळखून त्यांची जोपासन करा. थोडक्यात ऑनलाईन शिक्षणाबरोबर आपला पाल्य आनंदी व सुरक्षित ठेवणे हे महत्वाचे आहे. संकटे तर येतच राहणार पण येणार्या संकटावर मात करून आपण पुढे जाणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याचे मानसिक आरोग्य जपून त्याच्या अंगी प्रामाणिकपणा व स्वयंअध्ययनाची सवय निर्माण होण्यास शिक्षकांबरोबर पालक म्हणून आपली जबाबदारी देखील महत्वाची आहे. अखंड सावधानता ही काळाची गरज आहे.
मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा कारण नशीब बदलो अथवा न बदलो पण वेळ नक्कीच बदलते. आवड व विश्वास असल्यास अवघड कोणतीच गोष्ट नाही. सुखाचा शोध घेण्यासाठी जीवन हरवण्या पेक्षा जीवनात हरवून कर्तव्यात गढून जावून जीवनाचा खरा आनंद घेऊया. आलेले संकट लवकरच दूर होऊन पुन्हा एकदा सारी बालके शाळामाऊलीच्या प्रांगणात बागडतील, रमतील व शिकतील अशी आशा करूया तो पर्यंत शिक्षक व पालक आपण दोघेही शिक्षणदूत म्हणून कार्यरत राहूया.
लेखन : मोहनराव पो. गुरव
श्री हनुमानगिरी हायस्कूल, पुसेगाव
शब्दांकन : प्रकाश राजेघाटगे,बुध
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |