10:28pm | Aug 26, 2020 |
सातारा : कोरोना व्हायरस जेव्हा भारतात पसरला तेव्हा आगापिछा नसलेले प्रशासकीय निर्णय याचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरले. गर्दीखोर भारतीय आणि कागदी घोडे नाचवणारी बाबुगिरी, मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारी खाबुगिरी, यामुळे कोरोनाचे अवडंबर झाले. व्हायरसचे जीवशास्त्र समजून न घेतल्यामुळे शासकीय व वैद्यकीय यंत्रणेचा फज्जा उडाल्याचे वास्तव असल्याचे स्पष्ट मत सातार्यातील प्रसिद्ध फिजिशियन व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नटराज द्रविड (एम.डी. मेडिसीन) यांनी व्यक्त केले आहे.
कोव्हिड-19 या व्हायरसबाबत डॉ. नटराज द्रविड यांनी वैद्यकीय भाषेत सुस्पष्ट मांडणी करताना परखडपणे मते मांडली. ते म्हणाले, चीनमधून सर्वदूर पसरलेला कोरोना व्हायरस चिनी एकाधिकारशाहीचा दुष्परिणाम आहे. याला कोव्हिड- 19 नाव देणे हा जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यू.एच.ओ.) चीनला क्लीन चिट देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मी येथे सर्वपरिचित ‘कोरोना व्हायरस’ हा शब्द वापरत आहे. वास्तविक पाहता, कोरोना व्हायरस हे व्हायरसच्या एका मोठ्या गटाचे नाव आहे. कोणताही व्हायरस हा पूर्णपणे अविकल्पी परोपजीवी असतो. हा एकदा शरीराच्या पेशींमध्ये घुसला, तर स्वत:च्या प्रतिकृती तयार करून त्या पेशीचा विलय करूनच थांबतो. या प्रतिकृती इतर पेशींमध्ये घुसून त्या पेशींचा नाश करतात. याप्रमाणे शरीराच्या ऊतींचे कायमस्वरूपी अथवा तात्पुरते नुकसान होते. परंतु, फक्त व्हायरस नुकसान करत नाही. या कोरोना व्हायरसच्या प्रत्यक्ष नुकसान करण्याच्या क्षमतेपेक्षा रुग्णाच्या शरीराच्या व्हायरसला प्रतिकार करण्याच्या पद्धतीमुळे रुग्ण अत्यवस्थ होतो. क्वचित रुग्ण अत्यवस्थ होतात व बहुतेक सर्व सौम्य आजार होऊन आपोआप बरे होतात. सर्वसामान्यांना कळेल असे उदाहरण द्यायचे म्हटले, तर घरात उंदीर आल्यावर त्याला मारण्याकरिता बंदूक वापरणे जसे उंदरापेक्षा घरासाठी घातक आहे तसे काही रुग्णाचा प्रतिकार हा व्हायरसपेक्षा शरीराला संपवतो, हे भीषण वास्तव लक्षात घ्यायला हवे. याकरिता व्हायरल लोड किंवा व्हायरसची रक्तातील संख्याघनता ही संकल्पना समजून घेणे जरुरीचे आहे.
डॉ. नटराज द्रविड म्हणाले, सर्वसाधारणपणे ज्या कोरोना रुग्णांमध्ये व्हायरल लोड कमी असतो ते लवकर व जादा अत्यवस्थ होतात, तर ज्या रुग्णांमध्ये व्हायरल लोड जादा असतो ते कमी आजारी होतात. लहान मुले ज्यांच्यामध्ये व्हायरल लोड अतिप्रमाणात असतो ती मोठ्या प्रमाणात रोग पसरवतात; पण त्यांना आजार होत नाही हा विरोधाभास का? हे पुढे येईलच; पण पीसीआर टेस्टमध्ये सीटी व्हॅल्यूप्रमाणे व्हायरल लोडविषयी अत्यंत सुयोग्य डेटा मिळतो. याविषयी दुर्दैवाने जागृती होऊ दिली जात नसल्याची खंत डॉ. नटराज द्रविड यांनी व्यक्त केली.
प्रथम ज्याला सर्वसाधारण लोक ‘जनरल रेसिस्टंट पॉवर’ हा शेंडाबुडखा नसलेला शब्द वापरतात व डॉक्टरही या शब्दाच्या वापराला उत्तेजन देत असल्याचे सांगून ते म्हणाले, रोगप्रतिकारक शक्ती हा थातूरमातूर शब्द रुग्णांच्या तोंडावर फेकायला योग्य आहे. प्रत्यक्षात शरीराची प्रतिरक्षा प्रणाली किंवा प्रतिक्षमता प्रणाली ही अत्यंत क्लिष्ट, सर्व शरीराचे नियंत्रण करणारी, शरीराच्या चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवणारी प्रणाली आहे.
मधुमेही, स्थूल व्यक्ती, हृदयरोगी, दीर्घकाळ व्याधी असणार्या व्यक्ती यांच्यामध्ये ही प्रणाली आधीपासूनच अधिक तिरकस म्हणजे अयोग्यरीत्या कार्यरत असते, याला र्ईीेंर्ळााीपश उेपवळींळेप किंवा स्वयं प्रतिक्षमता असे म्हणतात. याचा अर्थ शरीराची ही प्रणाली शरीराच्या ऊतींचे दीर्घकाळ हळूहळू नुकसान करते. जेव्हा कोरोना व्हायरस हल्ला करतो तेव्हा त्याचा हल्ला घातक आहे, असे ही प्रणाली ठरवते व प्रतिहल्ला करते. यामध्ये व्हायरसचे नुकसान होईल किंवा नाही, फक्त शरीराचा नाश होतो. यामुळे हे रुग्ण कमी संसर्ग करणारे असतात व यांच्यापेक्षा जवळपास लक्षण नसणार्या व्यक्ती या सुपर स्प्रेडर म्हणून जादा घातक ठरतात. परंतु, आता याविषयी विचार व उपचार करण्याची वेळ निघून गेलेली आहे. ‘चिडीयाँ चुग गयी खेत.’ प्रशासन मान्य करो किंवा न करो, कोरोनाचा सामाजिक संसर्ग झालेलाच आहे. आता जनतेला कोंडून ठेवणे हा फक्त अन्याय असल्याची भावना डॉ. नटराज द्रविड यांनी बोलून दाखवली.
ते म्हणाले, कोरोना काही रुग्णांना मरेपर्यंत वेठीस धरतो व बहुतेक सर्व त्याच्या कचाट्यातून सुटतात. हे सर्व या व्हायरसला शरीर कसे प्रतिसाद देते यावर अवलंबून आहे. शरीराचा अत्यंत अयोग्य प्रतिसाद म्हणजे मृत्यू. याविषयी पुढील लेखात सांगता येईल. कोरोनाचा मृत्यू दर दोन टक्क्याच्या आत असल्याविषयी जे सरकारी लोक समाधान बाळगतात त्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ज्यांच्या घरी मृत्यू झाला आहे त्यांच्याकरिता हा दर 100 टक्के आहे.
महासुदर्शन चुर्णमुळे व्हायरस सौम्य...
शरीराची प्रतिक्षमता प्रणाली सुयोग्यपणे रुळावर आणण्यासाठी आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासून औषधे आहेत. 1 चमचा महासुदर्शन चूर्ण 3 कप पाण्यात उकळून गाळून दोन वेळा घेणे, त्याबरोबर संशमनी वटी 4 गोळ्या दोन वेळा घेतल्यावर कोणत्याही व्हायरसचा संसर्ग सौम्य होतो, हा माझा स्वत:चा 30 वर्षांचा अनुभव आहे. आणखीही काही औषधे आहेत. पुढील भागात त्याची माहिती घेता येईल, असेही डॉ. नटराज द्रविड यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |