महाबळेश्वर : जय भवानी..जय शिवाजीच्या..जयघोषात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन शासनाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या वेळी जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा, पोवाडा, ढोल-ताशा-हालगी, तुताऱ्या, लेझीम यांचा गजर करीत चांदीच्या पालखीतून छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेची सवाद्य निघालेली भव्य मिरवणूक,छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून केकेली पुष्पवृष्टी तसेच रोमांच उभे करणारे शिवकालीन ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक या वैशिष्ट्यांसह आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भल्या पहाटे सुर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरवात झालेल्या सोहळ्याने वातावरण भारुन गेले होते.
आज भल्या सकाळी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते भवानी मातेला महाअभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे पती श्री.पुरणेश गुरुनानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे सपत्नीक, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड व सौ वैष्णवी गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले, उपवन संरक्षक भरतसिंग हाड्डा, तहसीलदार सौ.मीनल कळस्कर, माजी आमदार नितीन शिंदे, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ.स्वप्नाली शिंदे, प्रतापगड-कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे, प्रतापगडचे उपसरपंच जनार्दन जंगम, प्रभारी नायब तहसीलदार श्रीकांत तिडके, महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल नारायण गायकवाड, आनंदा उतेकर, चंद्रकांत उतेकर, विजय जाधव, सुरेश सावंत, सखाराम मोरे, राजेंद्र जंगम, पुण्याचे उद्योजक रवींद्र भोसले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात व षोडशोपचारे पुजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पारंपारिक सेवेकरी विजय हवालदार, पुजारी नरहरी चिंतामण हडप, विष्णू कदम, भवानी माता मंदिर व्यवस्थापक विठ्ठलसिंह परदेशी(काका), नरेंद्र परदेशी,महेश सोनावणे, अभय हवलदार, तसेच प्रतापगड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भवानी मातेच्या मंदीरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची शिवमुर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणुक सुरु झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक नगराध्यक्षा यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, श्री. छ.शिवाजी विद्यालय कुंभरोशीच्या मुलामुलींचे लेझीम- तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला होता.
पालखीचे शिवरायांच्या आश्वारुढ पुतळयाजवळ आगमन झाल्यावर छत्रपती च्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ' क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज ...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर शिव कर्तृत्वाचा महिमा सांगणारा जोशपूर्ण पोवाडा शाहीर प्रभाकर आसनगावकर यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक बँकेचे माजी चेरमन विठ्ठल माने यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, श्री. छ.शिवाजी विद्यालय कुंभरोशी, परसोंडच्या मुलामुलींनी काठ्यावर उभे राहून मिरवणुकीत सहभाग घेतला होता. व वाहवा मिळवली तसेच शिवरायांच्या कर्तुत्वाची महती सांगणाऱ्या गीताचे समूह गायन केले. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूरच्या युवकांनी सादर केलेले मर्दानी खेळ त्यात लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, आगीचे खेळ आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान मागील वर्षाचा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे सातत्याने शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयावर हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून पुष्पवृष्टी करण्यात येते, यावर्षीही उद्योजक अविनाश भोसले यांच्या हेलिकॉपटरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यावेळचे वातावरण अत्यंत जल्लोषमय होते व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |