03:50am | Dec 04, 2019 |
पाचगणी : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षिकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असणारी पर्स माकडाने हिसकावून नेल्याने एकच गलका उडाला. पण श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीतून हि पर्स मिळवून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बेळगाव येथील गजानन भातखंडे हायस्कुलची सहल महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आली हाती. क्षेत्र महाबळेश्वर येथे हि सहल आल्यावर ऑर्थरसिट पॉईंट पाहिल्यावर हि सहल एलफिस्टन पॉईंट येथे आली. या ठिकाणी सर्वजण पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक एका शिक्षिकेच्या हातात असणारी पर्स माकडाने पळवून नेली. शिक्षिका घाबरल्या आणि मोठी रक्कम पर्समध्ये असल्याने त्या मटकन खाली बसल्या. माकडाला हाकलण्याचा प्रयत्न विद्यार्थी व इतर शिक्षकांनी केला पण तोपर्यंत पर्स घेऊन माकड झाडावरून खोल दरीत गायब झाले. सर्वांची धावपळ सुरू झाली पण काहीच उपयोग झाला नाही.
पर्समध्ये विद्यार्थ्यांचे सहलीचे एक लाख रुपये असल्याने शिक्षिका रडायला लागल्या व शेजारील व्यावसायिक आनंद पवार यांना हि माहिती सहकारी शिक्षकांनी दिली. पवार यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्स जयवंत बिरामणे व अनिल लांगी याना माहिती दिली. ते दोघेही घटनेच्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता हजर झाले. ट्रेकर्स ८० ते १०० फुट दरीत उतरले खाली पोहोचल्यावर त्यांना ५०० रुपयेच्या नोटांचा एक बंडल व १०० रुपयेचा नोटांचा एक बंडल असे सापडले त्यानंतर अंधार पडल्याने दुसरे दिवशी सकाळी हे ट्रेकर्स पुन्हा दरीत उतरले. अगदी खोल दरीत गेल्यावर त्यांना २००० रुपयेच्या नोटांचा बंडल सापडला. नंतर आनंद वन भुवन येथे सहल विसावली होती तेथील मिलिंद भटकांडे या शिक्षकांना संपर्क करून हे एक लाख रुपये बिरामने व लांगी यांनी ताब्यात दिले. त्यामुळे सर्वानीच मुलांचे पैसे सापडल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.
शाळेच्या शिक्षकांनी धाडसी ट्रेकर्सचे आभार व्यक्त केलेच पण क्षेत्र महाबळेश्वर येथील ग्रामस्थाकडूनही बिरामने व लांगी यांचे कौतुक होत आहे.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |