सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटातील तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला आहे. या घटनेत 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टेम्पोतील मजूर बुलढाणा व अकोला भागातील आहेत. अपघातातील जखमींना सह्याद्री ट्रेकर्सचे जवान बचाव कार्यासाठी मदत करत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून तापोळा मार्गावर हा अपघात झाला आहे. आज शनिवारी सकाळी 8 वाजता मुकदेव घाटात हा अपघात झाला आहे. मजूरांना 407 टेम्पोमधून नेण्यात येत होते. घाटातून मजूरांना घेवून जाताना तीव्र उतारावरून हा टेम्पो कोट्रोशी पुलाजवळ पलटी झाला आहे.
प्राथमिक माहिती मिळतीनुसार जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. काही जखमींना तळदेव येथे, तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात आले आहे. अद्याप अधिकृत जखमी व मजूरांची संख्या समोर आलेली नाही. सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दिपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थ मदत कार्यात सक्रीय होते.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |