10:15pm | Mar 29, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्धता, माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
सातारा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पवार शुक्रवारी सातार्यात दाखल झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावरील येथील एका हॉटेलच्या दालनामध्ये हा मेळावा रंगला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचे सहा मतदार संघातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
पवारांनी यावेळी इंडिया आघाडीच्या सदस्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यामध्ये पावसाच्या अनुशेषामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे. सध्या माणसांच्या हाताला काम दुष्काळग्रस्त भागांमध्ये चार्याची सोय आणि पाण्याचे उपलब्धता या घटकांची गरज आहे. राज्यात 13 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे तत्कालीन दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. कृषिमंत्री असताना फळबागांच्या अनुदानासंदर्भातही आम्ही धोरणात्मक भूमिका घेतली होती. मात्र राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात कोणतेही ठोस निर्णय लोकसभेच्या राजकीय रणधुमाळीमुळे होताना दिसत नाहीत. राज्य सरकारचे राज्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष झाले आहे या संदर्भात योग्य उपाय योजना झाल्या नाही तर राष्ट्रवादी म्हणून आम्हाला प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.
देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने चालली आहे, या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, प्रत्येक राज्याला मद्यधोरण ठरवण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने दिल्ली सरकारने धोरण ठरवले होते. मात्र त्याचा गैरव्यवहाराशी संबंध जोडून त्यांना अटक करणे हे चुकीचे आहे. त्यांचे हे निर्णय हुकूमशाही पद्धतीने चालले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर केजरीवाल यांच्या अटकेची अमेरिका व जर्मनी या देशाने सुद्धा दखल घेऊन त्यावर टीका केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळत आहे. भविष्यात लोकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आल्यास आश्चर्य वाटायला नको. या सर्व हुकूमशाही प्रवृत्तीच्या निर्णयांना विरोध करण्यासाठी येत्या दोन आठवड्यात भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील कारभाराच्या विरोधात अनेक विरोधी पक्षांची एक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह माझीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी संघर्षाची रणनीती स्पष्ट केली जाणार आहे.
सातारा लोकसभेसाठी कोणता उमेदवार असणार, या प्रश्नावर मात्र पवारांनी राजकीय चतुरता दाखवली. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे आत्ताच उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. सहा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भूमिका आम्ही समजावून घेतल्या आहेत. या चर्चेमधून आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर अशी काही नावे समोर आलेली आहेत. त्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवार निश्चित केला जाईल, असे पवार म्हणाले.
महायुतीकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित झाल्यास सातार्याची जागा त्यांना देणार का? याबाबत पवारांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ते म्हणाले, ही जागा राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे उमेदवार हा राष्ट्रवादीचाच असणार असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
खासदार उदयनराजे भोसले यांची अधिकृत उमेदवारी अद्याप भाजपकडून जाहीर झालेली नाही त्यांनी महाविकास आघाडीशी संपर्क केल्यास त्यांना संधी मिळणार का? यावर ते म्हणाले, सध्या ते भाजपचे उमेदवार आहेत. तिकीट मिळाले म्हणून त्यांनी सातार्यातून रॅली सुद्धा काढली. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार कदापी शक्य नाही. अशी कोणतीही संधी त्यांना दिली जाणार नाही.
महाविकास आघाडीच्या संदर्भात चर्चा करणारे जानकर महायुतीच्या गळाला लागले, या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, माढ्याची जागा महादेव जानकर यांना द्यायची, अशी आमची इच्छा होती. त्या संदर्भात चर्चाही झाली होती. मात्र त्यानंतर ते आमच्याकडे पुन्हा चर्चेसाठी आले नाहीत. प्रत्यक्षात काय झाले मलाही कळले नाही. पक्ष पळवला जाण्याची नवीन पद्धत सुरू झालेली आहे. त्याबरोबर आता उमेदवारही पळवला जात आहे, अशी राजकीय मिश्किली त्यांनी केली.
खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का किंवा कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण स्वतः लोकसभा निवडणूक लढणार का, या दोन्ही प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, प्रकृतीच्या कारणास्तव खासदार श्रीनिवास पाटील ही निवडणूक लढणार नाहीत. तसेच मी सुद्धा कार्यकर्त्यांनी किती आग्रह केला तरी सातार्याची जागा लढवणार नाही कारण राज्यात तसेच राज्याबाहेरही मला प्रचारासाठी जावे लागणार आहे. जास्तीत जास्त वेळ राजकीय रणनीतीच्या कामांसाठी देणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही दोघेही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पवार यांनी सांगत नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |