नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच असेल असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे रोहित आगामी विश्वचषक खेळणार हे स्पष्ट झाले आहे. यावेळी जय शाह यांनी रणजी ट्रॉफीत न खेळणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघातील करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळणे बंधनकारक असते, असे शाह यांनी सांगितले. एखादा खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार देत असेल तर त्याची नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
जय शाह म्हणाले की, जे रणजी क्रिकेट खेळत नाहीत त्यांना आधीच फोनवरून कळवण्यात आले आहे. मी पत्र देखील लिहीन की, जर तुमचा मुख्य निवडकर्ता, तुमचा प्रशिक्षक आणि तुमचा कर्णधार असे म्हणत असेल तर तुम्हाला लाल चेंडूचे क्रिकेट खेळावे लागेल. कोणतेही कारण चालणार नाही. ही सूचना सर्व युवा आणि तंदुरूस्त खेळाडूंना लागू होते.
तंदुरूस्त असल्यास खेळावेच लागेल : शाह
तसेच रणजी स्पर्धेसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मार्गदर्शनानुसार असतो. जर एखादा खेळाडू दुखापतीचा सामना करत असेल, तो क्रिकेटपासून दूर असेल तर आम्ही त्याच्यावर काहीही लादू इच्छित नाही. पण तो तंदुरूस्त असेल आणि युवा खेळाडूंच्या श्रेणीतील असेल तर त्याचे कोणतेही कारण खपवून घेणार नाही. हा मेसेज सर्व करारबद्ध खेळाडूंसाठी आहे, असेही जय शाह यांनी म्हटले.
खरं तर यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवरून हा वाद सुरू झाला आहे. किशन हार्दिक पांड्यासोबत सराव करत आहे पण झारखंडच्या रणजी संघातून खेळण्यास तो तयार नाही. त्यामुळे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक खेळाडूला रणजी ट्रॉफीत खेळावे लागेल. अन्यथा निवड समितीच्या अध्यक्षांनी मला तशी सूचना दिली आहे आणि मी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणार असल्याचेही शाहंनी नमूद केले.
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |