सातारा : सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून खेळातील वाटचाल सुरू ठेवली होती. ते स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया आदितीने व्यक्त केली. या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे.
आदिती ही अत्यंत कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली. जागतिक करंडक स्पर्धेत २००६ नंतर सुवर्णपदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली होती. आदितीने भारताला १४ वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये ७२० पैकी ७११ गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.
माझं स्वप्न होत की, मला ‘अर्जुन’ पुरस्कार घ्यायचाच आहे; पण मला जेव्हा समजले की देशातील खेळाडूंच्यासाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कार मला जाहीर झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. हा पुरस्कार ज्यांच्यामुळे मला मिळाला, त्यामध्ये तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षक प्रवीण सावंत आणि माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. - आदिती स्वामी, अर्जुन पुरस्कार विजेती, तिरंदाज
आदिती स्वामीची कामगिरी :
1) आशियाई गेम्स २०२२ चीन - १ सुवर्ण, १ कांस्यपदक
2) आशियाई चॅम्पियनशिप बँकॉक - २ सुवर्णपदक
3) युथ चॅम्पियनशिप - आयर्लंड (लीमरिक) २ सुवर्णपदक
4) वर्ल्ड सीनियर चॅम्पियनशिप जर्मनी (बर्लिन) - २ सुवर्णपदक
5) वर्ल्ड कप १ अंटलिया (टर्की)
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |