10:42pm | Mar 29, 2024 |
सातारा : जावलीतील अवैधरित्या दारु विक्री करणारी चार जणांच्या टोळीस पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत.
जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील मेढा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख प्रेम ऊर्फ बबलु विलास पार्ट, वय २४ वर्षे,गणेश विष्णु शिंदे, वय २३ वर्षे,सनी विलास कासुर्ड, वय २२ वर्षे,राहुल रामा कुराडे,वय २५ वर्षे सर्व रा. मेढा, ता जावली जि. सातारा असून यांच्यावर गर्दी, मारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत पोहचवणे, अवैध दारुची चोरटी विक्री करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी संतोष तासगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षा करता तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. प्रस्तावाची चौकशी बी.वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली होती. सदर टोळीतील इसमांवर दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही सुधारणा झाली नाही. ते मेढा परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे मेढा तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता अश्या टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती. वरील टोळीस समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून मपोकाक ५५ प्रमाणे २३ उपद्रवी टोळयांमधील ७५ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे १९ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण ९६ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांच्या विरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.उ.नि तानाजी माने, पो.हवा प्रमोद सावंत,अमित संपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराया सणस, मेढा पोलीस ठाणेचे पो.ना. महेश शिंदे यांनी योग्य पुरावा सादर केले होते.
या कारवाईबाबत जावली तालुक्यातील सर्व स्तरावरून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व त्यांच्या सहकार्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |