सिडनी : वेटलिफ्टर्सपाठोपाठ भारतीय नेमबाजांनीही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. नेमबाज श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 23 वर पोहचली आहे.
त्याआधी, नेमबाज ओम मिथरवाल याने 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. ओम मिथरवालने अंतिम फेरीत 201.1 गुणांची नोंद केली.
ओमचं यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे दुसरं कांस्यपदक आहे. ओमने सोमवारीही पुरुषांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकच मिळवलं होतं.
राजस्थानातील माधोपूरचा रहिवासी असलेला ओम मिथरवाल अवघ्या 23 वर्षांचा आहे. चारच वर्षांपूर्वी ओम सैन्यात दाखल झाला होता. सध्या तो इंदूरजवळ महुआ गावात हवालदार पदावर आहे. वर्षभरापूर्वीच ओमचं लग्न अंजूसोबत झालं. त्याची पत्नी सध्या द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत आहे.
ओमने यापूर्वी मेक्सिकोतील नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदक पटकावलं आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकाच वेळी दोन पदकं जिंकल्यामुळे ओमला दुहेरी आनंद झाला आहे.
महाराष्ट्राची सूनबाई हीना सिद्धूनेही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदकं मिळवण्याचा मान पटकावला. हीनाने सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 23 पदकांची कमाई केली आहे. भारताने 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकांची कमाई केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |