नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जगतातील अनेक खेळाडू हे विक्रमांचे बादशाह आहेत. सध्या इंग्लडविरोधात सुरू असणार्या कसोटीत भारताचा पहिला डाव १०७ धावांवर गडगडला. यात कर्णधार विराट कोहलीचा जेमतेम २३ धावांचा वाटा, तरीही एक विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. विराट कोहली २०१८ या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
कोहलीने इंग्लडविरुद्धच्या सामन्यात २३ धावांची खेळी करत इंग्लडच्या जॉनी बेअरस्टॉ (१३८९ धावा) याला मागे टाकले. तिसर्या क्रमांकावर १३३८ धावांसह इंग्लंडचाच जो रूट आहे. तर भारताचा सलामीवर शिखर धवन २४ सामन्यांत १०५५ धावा करून या तालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे कर्णधार कोहली सर्व प्रकारांत यंदा २१ आंतरराष्ट्रीय सामन्यात २४ डाव खेळला. यामध्ये कोहलीने ६६.८५ च्या सरासरीने १४०४ धावा केल्या. यात कोहलीच्या नाबाद १६० धावांच्या खेळीचा समावेश असून ५ शतकी आणि ५ अर्धशतकी खेळींचाही समावेश आहे.
यंदा सर्वाधिक धावा जमावणार्या पहिल्या १० खेळांडूत विराट कोहली आणि शिखर धवन दोघेच भारतीय असून ८४१ धावांसह ११ व्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे.
दरम्यान, क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या लॉर्ड्सवर इंग्लंड आणि भारत दरम्यान कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेला भारताचा पहिला डाव अवघ्या १०७ धावांत गडगडला. यात कोणत्याही भारतीय खेळाडूला मोठी खेळी करण्यात पुन्हा एकदा अपयश आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |