भुवनेश्वर : भारताचे हॉकी हब म्हणून उदयास येत असलेल्या ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये आजपासून हॉकी वर्ल्डकप 2018 ची सुरुवात होत आहे. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात आज होत असली तरी एका शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाने मंगळवारी या स्पर्धेची सुरुवात झाली. येथील कलिंगा स्टेडियमवर अभिनेत्री माधुरी दीक्षित, शाहरुख खान, संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह इतर कलाकारांनी सादर केलेल्या रंगारंग कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकली.
हॉकी वर्ल्डकपमध्ये एकूण 16 संघांचा समावेश आहे. या 16 संघांचे चार ग्रुप तयार करण्यात आले आहेत. भारतीय संघाचा ‘सी’ ग्रुपमध्ये समावेश आहे, तर पाकिस्तान संघाचा ‘डी’ ग्रुपमध्ये समावेश आहे. स्पर्धेच्या सलामीचा सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंग करणार आहे. यजमान देश म्हणून सर्वांचे लक्ष भारतीय संघावर असणार आहे. मायदेशात होणार्या वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून 43 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची किमया हरेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघ करतो का याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत.
आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन बनणार्या भारतीय संघाने 1975 साली एकमेव वर्ल्डकप जिंकला होता. अजितपाल सिंग आणि त्याच्या संघाने रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती अजून कोणालाच करता आलेली नाही. 1982 साली मुंबईत झालेल्या स्पर्धेत भारताने पाचवे स्थान पटकावले होते.
गेल्या चार दशकांपासून युरोपियन संघांनी वर्ल्डकपमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवण्यावर भारताची स्पर्धेतील वाटचाल अवलंबून आहे.
हॉकी विश्वचषक 2018 च्या उदघाटन सोहळ्यात सर्वच कलाकारांनी आपली उच्चप्रतीची कला सादर करुन रंगत आणली. परंतु या सोहळ्यात जान आणली ती कबीर खान अर्थात शाहरुख खानने. त्याने आपल्या ‘चक दे इंडिया ’ या सिनेमातील ’.. ये 70 मिनट.. तुमसे कोई छिन नही सकता..!’ हा डायलॉग मारुन सारा माहौलच बदलून टाकला. त्याच्या या डागलॉगवर संपूर्ण स्टेडियमवर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि भारत माता की जय असा गजर झाला.
मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजता विश्वचषक स्पर्धेचा रंगारंग उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सादरीकरण केले. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ने ‘धरती का गीत’ नावाची नृत्यनाटिका सादर केली. यामध्ये 800 कलाकारांनी भाग घेतला होता. संगीतकार ए. आर रहमान याच्या वंदे मातरम आणि जय हिंद हिंद या गाण्यांनी बहार आणली. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्पर्धेचे उदघाटन झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. 1975 च्या विश्वविजेत्या संघातील काही खेळाडू यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |