मुंबई : क्रिकेट चाहते ज्या दिवासाची प्रतिक्षा करत होते तो दिवस उजाडला. जवळपास दीड वर्षाची प्रतिक्षा आज दुबईत संपणार असुन क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आज कोण बाजी मारेल याकडे लागले आहे. आशिया कपचा इतिहास पाहता १२ वेळा भारत - पाक समोरासमोर आले आहेत. यात भारताने पाकवर सहावेळा विजय मिळवला आहे तर पाकने पाचवेळा त्यामुळे ही लढत महत्त्वाची ठरणार आहे.
भारत पाक सामना म्हटल की दोन्ही देशाचे खेळाडू जीव तोडून खेळतात. इतर प्रतिस्पर्ध्यांविरोधात केलेली कामगिरी एका बाजूला असते तर पाक खेळाडूंनी भारताविरुध्द किंवा भारतीय खेळाडूने पाकविरुध्द केलेली कामगिरी दुसऱ्या बाजूला असते. त्यामुळे दीड वर्षानंतर होत असलेल्या या भारत-पाक यांच्यातील महत्त्वाच्या लढतीपूर्वी जाणून घ्या काही खास रेकॉर्ड्स...
पाकविरुध्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हिट
आत्तापर्यंत झालेल्या भारत विरूद्ध पाकमध्ये सर्वात धावा काढलेला भारतीय खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. पाकविरुध्द मास्टर ब्लास्टरने ६७ डावांमध्ये ४०.९च्या सरासरीने २,५२६ धावा काढल्या आहेत.
वसीम अक्रमकडून सर्वात जास्त भारतीय फलंदाजांची शिकार
पाकचा माजी गोलंदाज खेळाडू वसीम अकरम भारत विरूद्ध पाकमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचे रेकॉर्ड केले आहे. त्याने ४७ डावांमध्ये ६० विकेट घेतल्या आहेत. त्याने ३५ धावात ४ बळी या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे.
विराट कोहलीचे मास्टर ब्लास्टरला शतकी विदाई
मास्टर ब्लास्टरनंतर विराट कोहलीने २०१२ मध्ये पाक विरूद्ध झालेल्या सामन्यात १८३ धावा काढल्या होत्या. हा सामना मास्टर ब्लास्टरसाठी शेवटचा एकदिवसीय सामना होता.
गांगुलीने केला होता पाकचा निम्मा संघ गारद
भारत विरूद्ध पाक झालेल्या सामन्यात सर्वोकृष्ट गोलंदाजी भारताचा अष्टपैलू सौरभ गांगुलीने केली होती. गांगुलीने १९९७ मध्ये झालेल्या सामन्यात १० ओव्हरमध्ये केवळ १६ धावा काढल्या असुन ५ विकेट घेतल्या होत्या. हा सामना भारताने ३४ धावांनी जिंकला होता.
भारतvs पाक; सर्वाधिक शतकात सलमानची सचिनशी बरोबरी
भारत विरूद्ध पाकमध्ये झालेल्या सामन्यामध्ये सर्वात जास्त शतकाचे रेकॉर्ड दोन फलंदाजाच्या नावावर आहे. ते दोघे म्हणजे भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा पाकचा सलमान बट्ट. या दोघांनी एकमेकांविरुध्द प्रत्येकी ५ शतके केली आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |