वॉर्सा : भारताची महिला बॉक्सर मेरी कोमने पोलंड येथील ग्लिविसेत सुरू असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने कझाकस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 ने पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
मनीषानेही 54 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेनंतर मेरी कोमला दुखापत झाली होती. त्यामुळे तिने आशियाई स्पर्धांमधून माघार घेतली होती. मात्र, दुखापतीतून बरी झाल्यानंतर मेरी कोमने मोठी झेप घेतली आहे. 48 किलो वजनी गटाच्या या सामन्यात मेरी कोमच्या खेळापुढे तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा निभावच लागला नाही. उजव्या हाताने जोरदार प्रहार करत मेरीने प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलेच जेरीला आणत मेरीने 5-0 ने विजय मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दुसर्या सामन्यात युक्रेनच्या इव्हाना क्रुपेनियाने मनीषाचा 2-3 ने पराभव केला.
या वर्षातील मेरीचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा आणि भारतीय खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. बल्गेरिया येथे झालेल्या स्पर्धेत तिने रौप्यपदकही पटकावले होते. मेरीने रणनीतीची योग्य अमंलबजावणी केली, त्यामुळेच तिला सुवर्णपदक पटकावता आले. तिच्या खेळामध्ये कसलीही कमतरता नव्हती. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत तिने या अंतिम फेरीवर आपले वर्चस्व राखले होते, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक राफाएल बेर्गामास्को यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |