नवी दिल्ली : येथील खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सोनिया चहल हिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.उपांत्य फेरीत सोनियाने उत्तर कोरियाच्या जो सोन व्हा हिचा 5-0 असा पराभव करून तिने किमान रौप्यपदक निश्चित केले. 57 किलो वजनी गटात भारताच्या सोनियाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते. तिने प्रतिस्पर्धी बॉक्सरला सामन्यात डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तिला एकतर्फी विजय मिळविता आला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोनिया चहल हिने कोलंबियाच्या येनी कास्टनाडा हिच्यावर 4-1 असा विजय मिळविला होता आणि उपांत्य फेरीत धडक मारली होती.
हे भारतासाठी दुसरे किमान रौप्यपदक आहे. याआधी स्टार बॉक्सर मेरी कोम हिने काल अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिचा पराभव केला. तिने ह्यांग हिचा 45 ते 48 किलो वजनी गटात 5-0 असा पराभव केला होता.
दरम्यान, भारताची सिमरनजित कौर हिला मात्र 64 किलो वजनी गटात चीनच्या ड्युओ डॅन हिने पराभूत केले. त्यामुळे सिमरनजित कौरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याने 4-1 असे पराभूत केले. त्यामुळे भारताला अद्याप 2 कांस्यपदके मिळाली आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |