दुबई : महेंद्र सिंह धोनीने तब्बल दोन वर्षांनंतर कर्णधार पदाच्या भुमिकेत पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. तब्बल ६९६ दिवसांनी धोनी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवित आहे. २९ आक्टोंबर २०१६ मध्ये धोनीने शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध कर्णधार म्हणून खेळला होता. याच पाश्वभूमीवर कालच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातील माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनचे तीन विक्रम तुम्हाला माहिती आहेत का? तर जाणून घेऊयात ते तीन विक्रम....
२०० व्या सामन्यात नेतृत्व करणारा तिसरा कर्णधार ठरला
आशिया चषकातील सुपर चार गटात भारताचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी झाला. या मालिकेत कर्णधार रोहितला विश्रांती देऊन संघाच्या नेतृत्वाची धुरा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीवर सोपवण्यात आली. या सामन्यापूर्वी, धोनीने १९९ एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदाची धूरा सांभाळली आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने ११० सामने जिंकले. भारतीय संघासाठी सर्वाधिक यशस्वी कर्णधार धोनी ठरला आहे. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार या नात्याने धोनीचा हा २०० वा सामना आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने ऑस्ट्रेलियाचं २३० सामन्यांमध्ये नेतृत्वं केलं आहे तर स्टिफन फ्लेमिंगने २१८ सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व केलं आहे.
वयाच्या ३७व्या वर्षी कर्णधारपदाचे नेतृत्व पार केले
महेंद्रसिंह धोनी हा आता भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने वयाच्या ३६ वर्ष १२४ दिवसापर्यंत भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. रोहितच्या अनुपस्थितीत कालच्या सामन्यात धोनीने ३७ वर्ष ८० व्या दिवसात भारताचं नेतृत्व करुन हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
धोनीच्या नावावर सर्वाधिक अनिर्णित सामन्यांची नोंद
कर्णधार या नात्याने महेंद्रसिंह धोनीच्या नावावर सर्वाधिक अनिर्णित सामन्यांची नोंद आहे. धोनीच्या काळात आतापर्यंत ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. रिची रिचर्डसन, स्टिव्ह वॉ आणि शॉन पोलॉक यांच्या कर्णधारपदाच्या काळात ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
वन-डे सामन्यात धोनीने द्रविडला टाकले मागे
भारताकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळणाऱ्यांच्या यादीत धोनी आता दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने राहुल द्रविडला मागे टाकलं आहे, द्रविडने ५०४ सामने खेळले असून धोनीच्या नावावर ५०५ सामने जमा झाले आहेत. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर ६६४ सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |