RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

विहारीची पहिल्याच सामन्यात विक्रमाला गवसणी

10 September 2018 at 19:18

ओव्हल : भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीने पहिल्याच डावात उत्कृष्ट फलंदाजी केली. विहारीच्या याच खेळीमुळे भारतीय संघाचं सामन्यातील आव्हान कायम राहण्यास मदत झाली. विहारीने पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावलं आणि एका विक्रमावर आपलं नाव कोरलं.

विहारीने अर्धशतक ठोकल्याने पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक ठोकणारा तो 26वा खेळाडू ठरला आहे. विहारीच्या आधी हार्दिक पांड्याने हा कारनामा केला होता.

याशिवाय करिअरच्या पहिल्याच डावात इंग्लंडमध्ये अर्धशतक ठोकणार विहारी चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी रुसी मोदी 1946मध्ये 57 धावा, सौरव गांगुलीने 1996मध्ये 131 आणि आणि राहुल द्रविडने 1996मध्ये 95 धावा केल्या होत्या.

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या तीन कसोटी सामन्यांनंतर जाहीर करण्यात आलेल्या संघात हनुमा विहारीची निवड झाली होती. मात्र, चौथ्या सामन्यात विहारीला संघात जागा मिळाली नव्हती. अखेर शेवटच्या सामन्यात विहारीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि या संधीचं विहारीनं सोनं केलं.

 

वय वर्षे नऊ अन् सुवर्ण पदके वीस

खाणं, खेळणं, मनसोक्त कार्टून पाहणं अन् वेळ मिळालाच तर अभ्यास करणं. हा दिनक्रम सरासरी नऊ वर्षीय मुला-मुलींचा असतो.

7 hours before

खेलरत्न पुरस्कार नाकारण्यात आलेला 'हा' खेळाडू ठरला जागतिक क्रमवारीत नंबर १

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले.

12 November 2018 at 15:34

भारतीय महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा विजय, पाकिस्तानला चारली धूळ

महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव करत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.

12 November 2018 at 15:22

हरमनप्रीत कौरच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने, विंडीजमध्ये सुरु असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात इतिहासाची नोंद केली आहे.

10 November 2018 at 18:24