12:40pm | Oct 21, 2022 |
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी ‘लोकसंख्येचे असंतुलन’ असे वक्तव्य केले होते. त्यावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. होसाबळे यांच्या या वक्तव्याविषयी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी संघाचे लोक म्हणायचे की लोकसंख्येत असंतुलन आहे. कारण मुस्लिम जास्त मुलांना जन्म देतात. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या गोष्टी ऐकवल्या जात नाहीत, पण ते लोकसंख्येचे असंतुलन कसे आहे ते सांगितले जात आहे. त्याचबरोबर धर्मांतर आणि घुसखोरीमुळेही लोकसंख्येचे संतुलन बिघडत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, 53 टक्के मुस्लिम हे कुटुंब नियोजन करत नाहीत, पण 42 टक्के हिंदूदेखील कुटुंब नियोजन करत नाहीत. मुस्लिम दोषी असतील तर हिंदूसुद्धा नंबर दोनचे गुन्हेगार आहेत असंही त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या क्रमांकावर हिंदूही दोषी आहे. पण त्याकडे देशभक्तीच्या नजरेने पाहू नये, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याभेटीविषयी बोलताना त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतात घुसखोरी झाली आहे हे त्यांनी मान्यही केले. त्याविषयी ते बोलताना म्हणाले की, आणि त्याची आकडेवारीही सरकारकडे आहे. मात्र एवढ्या मोठ्या देशात दोन, चार किंवा 10 लाख मुस्लिम आले तर त्याचा संपूर्ण देशातील लोकसंख्येचा तोल फारसा बिघडणार नाही. मात्र ज्या भागात घुसखोरी होते, त्या भागावर मात्र त्याचा थोडासा परिणाम होतो, पण त्याचा सगळ्या भारतावर परिणाम होईल असं नाही होत. लोकसंख्येच्या संतुलनावर बोलता बोलता त्यांनी घुसखोरीवरुन सरकार आणि आरएसएसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमच्या संघाचे सरकार आहे.
जनजागृती आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत
त्यामुळे ही घुसखोरी तुम्ही थांबवणे गरजेची आहे. त्याबरोबरच बांगलादेशी मुस्लिमांचा फटका भारतीय मुस्लिमांना बसला आहे. देशातील प्रत्येक मुस्लिमाना बांगलादेशी किंवा पाकिस्तानी असं संबोधले जाते, आणि ते कैक वर्षांपासून हेच चालू आहे. त्यामुळे भारतात होणारी घुसखोरी ही थांबवणे गरजेची आहे. शिक्षणाचा योग्य प्रचार आणि प्रसार झाला, उत्पन्न वाढले आणि सेवा वितरणाची सोयी झाल्यानंतरसुद्धा लोकसंख्या कमी होते. तर दुसरीकडे मात्र भारतातील मुस्लिम हा सर्वाधिक मागासलेला आहे. त्यामुळे लोकसंख्या धोरणाबरोबरच या जनजागृती आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितले.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |