12:43pm | Apr 23, 2021 |
मुंबई : आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावल्याने चेन्नई सुपर किंग्जसला धक्का बसला आहे. या सामन्यापूर्वीच तीन विजयांसह आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत दुसर्या स्थानावर होता. चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान गुण होते, पण नेट रनरेट जास्त असल्यामुळे चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला होता. आजच्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. हा आरसीबीचा चौथा विजय ठरला आणि त्याचबरोबर गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे. आठ गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
देवदत्त पडीक्कलच्या नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 10 विकेट्स राखून विजय साकारला. आरसीबीपुढे राजस्थानने विजयासाठी 178 धावांच्या ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने एकही विकेट गमावला नाही. देवदत्त पडीक्कलने यावेळी धडाकेबाज शतक साकारले, त्याला यावेळी कोहलीने चांगली साथ दिली. पडीक्कलने यावेळी 52 चेंडूंत 11 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद 101 धावांची खेळी साकारली. कोहलीने यावेळी 47 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद 72 धावा केल्या.
राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, पण त्यांच्या फलंदाजांना यावेळी सूर गवसला नाही. राजस्थानची 3 बाद 18 अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर संजू सॅमसनने काही काळ धडाकेबाज फलंदाजी केली खरी, पण षटकार ठोकल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या दुसर्याच चेंडूवर तो बाद झाला. संजूने यावेळी दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 21 धावा केल्या. शिवम दुबे आणि रायन पराग यांची चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी पाचव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचली. पण यावेळी पराग 25 धावांवर आऊट झाला आणि ही त्यांची भागीदारी संपुष्टात आली.
पराग बाद झाला असला तरी शिवम चांगली फटकेबाजी करत होता. पण यावेळी शिवमचे अर्धशतक फक्त चार धावांनी हुकले. शिवमला यावेळी केन रीचर्डसनने बाद केले. शिवमने यावेळी 32 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 46 धावा केल्या. त्यानंतर राहुल तेवातियाने यावेळी 23 चेंडूंत 40 धावा केल्यामुळे राजस्थानला 177 धावा करता आल्या.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |