12:24pm | Jun 13, 2022 |
सातारा : सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेकांनी क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटवला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक अधिकारी देखील ज्या ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत तिथे देखील सातारा जिल्ह्याचा नावलौकिक गाजवत असून कराड येथील असलेले व सध्या अमरावती येथे शहरात पोलीस उपायुक्त असलेल्या विक्रम साळवी यांनी नॉनस्टॉप 300 किलो मीटर सायकलिंग करुन अजोड कामगिरी करत सातारा जिल्ह्याचे नाव उंचावले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विक्रम साळी मूळचे कराड जि. सातारा येथील असून ते पोलीस उपअधीक्षक (2010) म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले. सध्या ते पोलीस उपायुक्त म्हणून अमरावती शहर येथे नियुक्तीस आहेत. साळी यांची आतापर्यंतची सर्व पोस्टिंग विदर्भात झालेली असून त्यांनी BRM तर्फे आयोजित केलेल्या वाशिम - अमरावती - वाशिम या 300 किमी सायकल स्पर्धेत नाव उंचावले.
या 300 किमी सायकल स्पर्धेची कट ऑफ वेळ 20 तास होती परंतु साळी यांनी ती कुठेही न थांबता 16 तासात पुर्ण केली, याबद्दल साळी यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन्ही झोन ची जबाबदारी पार पाडून रोज पहाटे 3-4 तास सराव करत असत. साळी यांचेकडे सध्या अमरावती शहर झोन 1 आणि मुख्यालयची जबाबदारी असून ती पार पाडून मिळालेल्या वेळात ते सकाळी रात्री अपरात्री सायकल राईडवरून आपल्या कामाचा फरफटका देखील घेत असायचे.
300 किमी सायकल स्पर्धा पुर्ण करणारे पहिले अधिकारी
नॉन स्टॉप 300 किमी सायकल स्पर्धा पुर्ण करणारे विक्रम साळी हे राज्य पोलीस सेवेतील पहिले अधिकारी आहेत. यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दुबईत हाप आयर्नमॅन किताब पटकावला होता. हेही मूळचे सातारचे हाही एक योगायोग. विक्रम साळी यांनी यापूर्वी देखील 200 कि. मी. सायकल अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली. सायकल स्पर्धा पुर्ण करण्यासाठी साळी यांना अनेक मित्रमंडळी, अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले त्यात श्रीमती आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती शहर, पोलीस उपायुक्त नागपूर गजानन राजमाने, पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, आयर्नमन हार्दिक पाटील, मॅरेथॉन रनर जयेश यमकर, देवानंद भोजे, विजय धुर्वे, आदीचे सहकार्य लाभले अँड. अरुणा पुरोहित, आंतराष्ट्रीय सायकलस्वार डॉ. अमित समर्थ, तसेच आई-वडील, पत्नी आदींचे मार्गदर्शन लाभले
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |