12:49pm | Nov 04, 2022 |
दिल्ली : व्हॉट्सऍपवर कम्युनिटीज, इनचॅट पोल आणि ग्रुप व्हिडिओ कॉलिंग संदर्भात भन्नाट फीचर लाँच करण्यात आले आहे. व्हॉट्सऍपच्या ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये आता एकाच वेळी 32 सदस्य सहभागी होऊ शकतील. यापूर्वी केवळ आठ युजर्स सहभागी होऊ शकत होते. याशिवाय ग्रुप सदस्यांची संख्या वाढवली आहे. एका ग्रुपमध्ये आता 1024 सदस्य जोडले जाऊ शकतात, यापूर्वी ही मर्यादा 512 इतकी होती.
व्हॉट्सऍपची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी व्हॉट्सऍपवरील नव्या फीचर्सची घोषणा केली. यापैकी महत्त्वाचे फीचर म्हणजे कम्युनिटी ग्रुप. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने या फीचरबाबत घोषणा केली होती, त्यानंतर विविध झोनमध्ये त्याच्या चाचण्या सुरू होत्या.
समान रुची असलेल्या लोकांना एकाच छताखाली आणणे हे याचे उद्दिष्ट आहे. कम्युनिटी ग्रुप फीचरमुळे युजरला आता वेगवेगळे ग्रुप तयार करण्याची गरज नाही. युजरने आवश्यक सदस्यांची कम्युनिटी तयार केली की हवा असलेला मेसेज इच्छीत युजरला पाठवता येईल.
मोठी फाईल करा शेअर
व्हॉट्सऍपवर आता 2 जीबीपर्यंत फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करता येणार आहे. याआधी केवळ 16 एमबी एवढीच मर्यादा असल्यामुळे त्याहून अधिक साईजचे डॉक्युमेंट पाठवण्यासाठी युजर्स इतर ऍपचा पर्याय निवडताना दिसत होते. व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये इन-चॅट पोलदेखील घेता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुपमधील सदस्य एखाद्या प्रश्नावर आपले मत नोंदवू शकणार आहेत. व्हॉट्सऍपने हे फीचर कसे दिसेल आणि त्याची कार्यक्षमता अद्याप उघड केलेली नाही. नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सऍप अपडेट करावे लागेल.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |